आरोग्य

Health : गव्हाव्यतिरिक्त 'या' दोन पिठाच्या भाकरी खाणे फायद्याचे; हाडे होतील मजबूत

सकाळ डिजिटल टीम

तुमचं आरोग्य उत्तम आणि रोगविरहीत असेल तरच निरोगी जीवन आनंदाने जगता येते. तुम्ही कोणतेही काम चांगल्या प्रकारे करू शकता. यासाठी पौष्टिक आणि प्रथिनांनीयुक्त असलेला आहार घेणे आवश्यक असते. आपण रोजच्या आहारात गव्हाच्या रोटीचा समावेश करतो. मात्र याशिवाय अशी काही तृणधान्ये आहेत जी तुम्हाला निरोगी ठेवतात.

या काही निवडक तृणधान्यांसंदर्भात अगदी थोड्याफार लोकांना माहिती आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की गव्हाशिवाय नाचणीच्या आणि बाजरीच्या पिठाची भाकरीही आरोग्यासाठी फायदेशीर असते. या पीठाची भाकरी हाडांसाठी आरोग्यदायी असते. त्यामुळे या भाकरी खाल्ल्यानंतर शरीराला होणाऱ्या फायद्यांसंदर्भात आपण जाणून घेणार आहोत.

  • बाजरी आणि नाचणीपासून बनवलेल्या भाकरीही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. जे शरीर निरोगी ठेवण्याचे काम करतात.

  • या दोन्ही पिठांच्या भाकरी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. वयोवृद्धांनी या पिठाची भाकरी जरूर खावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे सांधेदुखीलाही आराम मिळतो.

  • बाजरी आणि नाचणीची भाकरी दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे संधिवात रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतात. यासह पित्तामुळे होणारी जळजळही कमी होते.

  • बाजरीत कॅल्शियम आणि फॉस्फरस अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. त्यामुळे बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर तुम्हाला हाडे दुखण्याचा त्रास होत असेल तर या दोन्ही पिठाच्या भाकरींचा आहारात लवकरात लवकर समावेश करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT