Powassan Virus Esakal
आरोग्य

New Virus Alert : आता जगासमोर आणखी एक टेन्शन! Powassan विषाणूमुळे एकाचा मृत्यू, काय आहेत लक्षणं?

टिक्स या लहान किड्यांच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होतो.

Sudesh

कोरोना, झिका आणि मंकीपॉक्सनंतर आता जगात आणखी एक खतरनाक विषाणू समोर आला आहे. पॉवासन असं या विषाणूचं नाव आहे. याची लागण झाल्यामुळे अमेरिकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या विषाणूवर अद्याप कोणताही उपचार वा लस उपलब्ध नाही. त्यामुळे पॉवासन रोग हा दुर्मिळ आणि गंभीर समजला जातो.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल प्रिव्हेन्शनने याबाबत माहिती दिली आहे. टिक्स या लहान किड्यांच्या माध्यमातून या विषाणूचा (Powassan Virus) प्रसार होतो. अमेरिकेत दरवर्षी सुमारे २५ लोकांना या विषाणूची लागण होते. मात्र, आता यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेसह कॅनडा आणि रशियामध्येही या विषाणूचे रुग्ण समोर आले आहेत.

टिक्समार्फत प्रसार

या विषाणूचा प्रसार टिक्स (Tick-borne Virus) या किड्यांपासून होतो. हे परजीवी किडे इतर प्राण्यांच्या वा पक्षांच्या रक्तावर जगतात. जंगलातील संक्रमित टिक चावल्यामुळे माणसांना या विषाणूची लागण होते. अमेरिकेत २०१५ सालापासून आतापर्यंत तीन व्यक्तींचा यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. डीअर टिक, ग्राऊंडहॉग टिक किंवा स्क्विरल टिक यांच्या माध्यमातून हा विषाणू मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो.

लक्षणे

या विषाणूची लागण (Powassan Virus Symptoms) झाल्यानंतर ताप, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा, अशी लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत राहतात. काही प्रकरणांमध्ये बोलण्यात अडचण दिसून येते. आजार गंभीर टप्प्यापर्यंत पोहोचल्यास दीर्घकालीन आरोग्य समस्याही उद्भवू शकतात.

उपचार

या आजारावर सध्या कोणताही उपचार उपलब्ध नाही. अँटीबायोटिक्स घेतल्याने लक्षणं कमी होऊ शकतात, मात्र पूर्ण उपचार शक्य नाही. त्यामुळे, संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करणे हाच एक उपाय आहे. यासाठी टिक्स असलेल्या ठिकाणी लांब बाही असलेले कपडे घाला, आणि फुल पँटचा वापर करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

SCROLL FOR NEXT