Sleep google
आरोग्य

Sleep Peacefully : शांत झोप ठरते निरोगी जीवनाचा पाया

आपले जीवन निरोगी आहे का, हे तपासण्याचा निकष म्हणजे आपल्याला येणारी आठ तासाची शांत झोप आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - आपले जीवन निरोगी आहे का, हे तपासण्याचा निकष म्हणजे आपल्याला येणारी आठ तासाची शांत झोप आहे. ही झोप म्हणजे विश्रांती नव्हे तर दीर्घायुषी बनविणारी, स्मृती व सर्जनशीलता वाढवणारी आरोग्यदायी व निरोगी जीवनाचा पाया रचणारी आहे.

सरकाडियन ऱ्हिदम

आपल्या मेंदूत ‘सरकाडियन ऱ्हिदम (circadian rhythm) नावाचे घड्याळ ‘सुप्राकयाझमॅटिक नुक्लियस’ नावाच्या मेंदूच्या छोट्याशा भागात असते. डोळ्यांतून आलेल्या प्रकाश संवेदना त्याला लगेच कळतात. संध्याकाळ ते मेलॅटोनीनद्वारे मेंदूला ‘अंधार होतोय, झोपेची वेळ झाली’ असा संदेश देते. दिवस उजाडल्यावर प्रकाशाची संवेदना डोळ्यांतून मेंदूकडे जाते. मेलॅटोनिनचे स्रवणे बंद होते. मेंदूला उठण्याचा इशारा मिळतो.

स्मृती व सर्जनशीलतेशी नाते

झोपल्यावर आपला मेंदू जास्त क्रियाशील असतो. नवीन गोष्ट शिकण्यासाठी मेंदूची तयारी आणि शिकल्यानंतर ती गोष्ट पक्की लक्षात ठेवायला शांत झोप अत्यावश्यक आहे. दिवसभरात मिळालेली माहिती मेंदूत हिप्पोकॅम्पस नावाच्या भागात साठवली जाते. झोपेत या स्मृती कॉर्टेक्समध्ये पाठवल्या जातात. मगच त्या गोष्टी स्मृतीत पक्क्या बसतात. म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यास व शांत झोपेचे संतुलन ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

पुनर्जीवन देणारी झोप

- शांत झोपेत शरीरातील निर्माण झालेली अनियमितता संपवणे, अंतर्गत प्रणालीची दुरुस्ती, विश्रांतीतून आजार बरे होणे अशी कामे होतात.

- झोपेत अमिलॉइडसारखी विषारी प्रथिने वेगळी केली जातात.

- निराशादायी, चुकीच्या घटनांमुळे उत्तेजित झालेल्या चेता संस्थेला झोपेमुळे विश्रांती मिळते.

- अपुऱ्या झोपेमुळे दिनचर्या, व्यायाम व भोजनाचा असमतोल लठ्ठपणा व मधुमेहाचे निमंत्रण देणारा ठरतो.

काय करावे

- उठण्याच्या वेळेप्रमाणे झोपण्याची वेळ निश्चित असावी

- नियमित व्यायाम, नितीमत्तापूर्ण व निर्व्यसनी जीवनशैली हवी

- रात्रीचे जेवण हलकेच असायला हवे

- झोपायची खोली शांत, पुरेशी थंड आणि अंधारी असावी

- रात्री आठनंतर सर्वच घरातले दिवे मंद ठेवावेत

- सगळे मोबाईल, टीव्ही स्क्रीन्स रात्री झोपेपूर्वी बंद व्हावेत

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रसन्न खटावकर म्हणतात की, नियमित झोप हा निरोगी जीवनाचा पाया आहे. पुरेशी व चांगल्या गुणवत्तेची झोप ही अत्यावश्यक आहे. झोपेत शरीरातील अनेक अनियमित झालेल्या प्रणातील नियमित होणे व दुरुस्तीचे काम (रिस्टोरेशन) होते. काही हार्मोन झोपेत स्त्रवतात. मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असते. एकाग्रतेचा संबंध झोपेशी असतो. अपुरी झोप अनेक आजारांना निमंत्रण देणारी असते.

सप्तशतीमध्ये देवीचे अनेक रूपाचे वर्णन करताना देवी ही बुद्धी, छाया, माता, शक्ती रूपात असल्याचे सांगितले आहे. त्याप्रमाणे या देवी सर्व भुतेषू निद्रा रुपेन संस्थिता, नमतस्यै नमतस्यै नमो नमः असे केले आहे. सर्व भुतांमध्ये (जीवांमध्ये देवी) ही निद्रा रूपाने स्थित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT