Fear of Exam sakal
आरोग्य

इनर इंजिनिअरिंग : भीती परीक्षेची...

गोष्ट अशी आहे, की तुम्ही काहीतरी शिकायला शाळेत जाता की काही सिद्ध करून दाखवायला जाता? तुम्ही हे ठरवणे आवश्यक आहे.

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

प्रश्न - आम्ही परीक्षेच्या भीतीवर कशी मात करू शकतो?

सद्‍गुरू - गोष्ट अशी आहे, की तुम्ही काहीतरी शिकायला शाळेत जाता की काही सिद्ध करून दाखवायला जाता? तुम्ही हे ठरवणे आवश्यक आहे. एखाद्या ठिकाणी सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही गेलात, तर यश आणि अपयश यांची भीती तुमच्या पाठीशी लागणार. शिकण्याची इच्छा असते, त्याच्यासाठी यश किंवा अपयश असे काही नसते, तर फक्त प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा प्रश्न असतो. तुम्हाला शिकण्यात रस असल्यास एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे हेच एक मोठे शिक्षण आहे.

तुम्ही काहीतरी कचरा डोक्यात साठवून आठवण्यासाठी नाही, तर नवनवीन काहीतरी शिकण्यासाठी आणि तुमच्या आयुष्याची क्षितिजे रुंदावण्यासाठी शाळेत जाता. तुम्हाला तुमच्या भोवतालच्या या सृष्टीविषयी समजावून घ्यावसं वाटतं आहे. हेच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, भूगोल म्हणजेच सर्वकाही आहे.

तुम्ही जे काही शिकत आहात तो कोणता विषय नाही, तर ते आपल्या जीवनाचे विविध विभाग आहेत. ते कदाचित अतिशय कंटाळवाण्या पद्धतीने तुमच्यासमोर सादर किंवा शिकवले जात असतील, पण तरीही ते जीवनाबद्दलच आहे. तुम्ही अशी गोष्ट शिकत आहात, ज्यामुळे तुमच्या आयुष्याची व्याप्ती वाढू शकते. तुम्ही जे शिकलात, ते शिकलात, जे शिकला नाहीत, ते नाही.

तुम्हाला कॉपी कशी करावी हे माहिती असेल, मी तर असे ऐकले आहे की काही ठिकाणी शिक्षकच अशा गोष्टींना प्रोत्साहन देतात! मला असे वाटत नाही, की तुमच्या आयुष्याच्या या प्रारंभिक टप्प्यावर, तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात फसवणुकीने करावी.

मी प्रामाणिकपणाविषयी बोलत नाहीये, मी आयुष्याला सरळपणे सामोरे जाण्याबद्दल बोलतोय, जेणेकरून उद्या, तुम्हाला लहानसहान गोष्टींत विकृत होऊन अडकून पडणार नाही. तुम्ही समाधानी असाल, ‘‘मी हा असा आहे. मला फक्त पस्तीस गुण मिळाले, ठीक आहे. परंतु त्यामुळे माझ्या आयुष्याची गुणवत्ता ठरणार नाही.’’

तुम्हाला मिळणाऱ्या गुणांमुळे आयुष्याची गुणवत्ता निश्चित केली जाणार नाही. तुम्ही किती प्रामाणिक आहात यावर मात्र निश्चितच तुमच्या आयुष्याची गुणवत्ता ठरणार आहे. तुम्ही काही लहानसहान गोष्टींसाठी तुमची सचोटी गमावू नये.

अन्यथा, उद्या मोठ्या गोष्टींचा सामना करावा लागेल, तेव्हा तुम्ही त्यासमोर उभे राहू शकणार नाही. थोडेफार गुण कमीअधिक मिळण्याने फारसा काही फरक पडणार नाही. तुम्ही किती शिकलात, आणि आज तुम्ही किती गोष्टी समजावून घेतल्या आहेत यामुळे मात्र खूप मोठा फरक पडणार आहे.

तुम्ही तुमचं शालेय शिक्षण पूर्ण करून बाहेर पडेपर्यंत, तुम्ही शक्य तेवढ्या गोष्टी समजावून, आत्मसात केल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही ज्ञानी, सक्षम आणि कौशल्यवान असावे अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून उद्या तुम्ही बाह्य जगात पाय ठेवाल, तेव्हा तुमच्या आयुष्याचं तुम्ही काहीतरी चीज कराल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT