Sadguru sakal
आरोग्य

इनर इंजिनिअरिंग : आध्यात्मिक मार्ग आणि सत्संग

अध्यात्माच्या नावाखाली आज जगात पुष्कळ गोष्टी घडत आहेत, ज्यांचा अध्यात्माशी काडीमात्र संबंध नाही.

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

अध्यात्माच्या नावाखाली आज जगात पुष्कळ गोष्टी घडत आहेत, ज्यांचा अध्यात्माशी काडीमात्र संबंध नाही.

अध्यात्माच्या नावाखाली आज जगात पुष्कळ गोष्टी घडत आहेत, ज्यांचा अध्यात्माशी काडीमात्र संबंध नाही. अध्यात्माच्या नावाखाली नैतिकतेची शिकवण दिली जात आहे; घोषणाबाजी अध्यात्म म्हणून शिकवले जात आहे; सांत्वन आणि मानसिक दिलासा एक अध्यात्म म्हणून गणले जात आहे. अध्यात्माच्या प्रक्रियेतून जाण्यासाठी सिद्ध आहे तो काही सांत्वन किंवा दिलासा शोधत नाहीये. त्याला ना धन-दौलतीची आशा ना कुठल्या घोषणाबाजी करणाऱ्या गटाचा सदस्य होण्याची इच्छा. ती व्यक्ती स्वतःवर पडलेल्या सर्व प्रभावांपासून मुक्त होऊन आणि त्यांच्या मर्यादांपलीकडे जाऊन; आतून आपले व्यक्तित्व वृद्धिंगत करत असते.

आध्यात्मिक प्रक्रियेकडे पाहण्याचा सोपा मार्ग म्हणजे, तुमच्यावर बिंबवलेले एकूण एक प्रभाव तुम्ही झटकून टाकता, बाहेरील परिस्थितीने तुमच्यावर पाडलेले सर्व डाग जेव्हा तुम्ही धुवून काढता, तेव्हा स्वाभाविकपणे तुम्ही आध्यात्मिक बनता. सगळीकडे घोषणाबाजीचे अध्यात्म सुरू आहे. घोषणाबाजीने आपण लोकांना एकत्र आणू शकतो, आपण जगात अनेक गोष्टी साध्य करू शकतो, पण घोषणांमुळे आपण आपल्या अंतरंगात मात्र डोकावू शकत नाही.

सत्संग : एक संधी

सत्संग याचा शब्दशः अर्थ आहे ‘सत्याबरोबर असणे’. सत् म्हणजे सत्य आणि संग म्हणजे बरोबर असणे किंवा मित्रत्वाने वागणे. सत्याबरोबर कोणी मित्रत्वाने कसे वागू शकेल? त्याकरता काय करावे लागेल? परम सत्य आपल्याला बाहेर शोधायची गरज नाही. ते नेहमी आपल्या आतच असते. त्यासाठी कोणाच्या मदतीची गरज नाही. परंतु, तुम्ही लोकांची मनोवृत्ती पाहिली आणि अनुभवांनी शहाणे होण्याऐवजी त्यांना दुःखी होताना पाहिलेत तर मग मदतीची गरज आहे असे वाटू लागते. सत्संग ही स्वतःचे अस्तित्व अनुभवण्याची संधी आहे. त्यात काही शिकणे, समजणे किंवा लक्षात ठेवणे अपेक्षित नसते. ही कोणाबरोबर तरी असण्याची संधी आहे. हे म्हणजे शब्दातून अथवा भाषेतून काही समजून घेणे नाही. कोणामध्ये अग्नी पेटलेला असेल तर आणि तुमची इच्छा असेल तर तो अग्नी तुमच्यात ही पेटू शकतो.

एक प्रश्न नेहमी विचारला जातो, ‘मी ते कसे मिळवू? मी त्या करता काय करू?’ त्यासाठी काहीही करायची गरज नाही. ते असे आहे की, तुम्ही ओला, नुकताच कापलेला लाकडाचा ओंडका असाल तर तुमच्यात अग्नी पेटवणे अवघड आहे. मात्र. तुम्ही कोरडे लाकूड असाल किंवा कागद असाल तर तुमच्यात अग्नी पेटवणे खूप सोपे आहे. तुम्ही पेट्रोलप्रमाणे झालात तर तुम्ही फक्त तुमच्या तिथे असण्याने पेटू शकता. मुद्दा असा आहे की, तुम्ही आत्ता कसे आहात? आणि तुम्ही किती सहज पेट घेऊ शकता. योगाचा उपयोग तुम्हाला थोडे फार कोरडे करण्यासाठी केला जातो जेणे करून तुम्ही सहज पेटू शकाल. तुम्हाला इतर कोणाचीही गरज भासणार नाही. तुम्ही तुमच्या वृत्तीनुसार स्वतःच पेट घ्याल. सत्संग ही स्वतः पेट घेण्याची अथवा त्याकरता निदान पात्र होण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT