Sadguru sakal
आरोग्य

इनर इंजिनिअरिंग : तुम्ही पूर्ण वेळ नशेने धुंद असू शकता!

कुणी शहाणा मनुष्य म्हणून गेला, ‘तुम्ही रोज एक सफरचंद खाल्लं तर डॉक्टरकडे जायची वेळच येणार नाही.’

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

कुणी शहाणा मनुष्य म्हणून गेला, ‘तुम्ही रोज एक सफरचंद खाल्लं तर डॉक्टरकडे जायची वेळच येणार नाही.’ तुम्ही ज्या कुठल्या प्रकारचे पेय घेत असाल, ती वाईन असो किंवा व्हिस्की, ते तुमच्या शरीराच्या रासायनिक अवस्थेमध्ये फेरफार करून तुम्हाला शांत आणि निवांत झाल्याचा अनुभव देते. ते काही वेळासाठी सुखावणारे असते. एक ग्लासभर प्यायलाने इतकं छान वाटत असेल, तर बादलीभर प्यायलात तर खूपच छान वाटलं पाहिजे, नाही का? परंतु ते तसं काम करत नाही.

मी काही दारूच्या किंवा भोगविलासाच्या विरोधात नाही. ते चूक आहे की बरोबर, हा प्रश्न नाही. हे काही कुठली नैतिक बाजू घेण्याबद्दल नाही. मला फक्त एवढं वाटतं की मनुष्य इतक्या छोट्या सुखांवर समाधान मानू लागले आहेत, जेव्हा की यापेक्षा खूप मोठे काहीतरी त्यांच्या आत शक्य आहे. तुम्ही सर्वकाळ नशेने धुंद असू शकता, आणि हे पूर्णपणे फुकट आहे. कुठलाही हँग-ओव्हर नाही आणि कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही! मूळ प्रश्न हा आहे, तुम्ही जीवनाच्या बाजूने आहात की जीवनाच्या विरुद्ध आहात? तुम्ही जीवनाच्या बाजूने असलात, तर ज्याला तुम्ही जीवन म्हणता ते नेमके काय आहे?

आत्ता सध्या, तुम्हाला तुम्ही जिवंत आहात हे कळतं ते केवळ तुम्ही पुरेसे सचेत आहात म्हणून. समजा तुम्ही झोपी गेलात, तर तुम्ही जिवंत आहात की मृत हे कसं कळेल? सगळा अनुभव नाहीसा होतो. मुळात, तुमच्या जीवनाच्या अनुभवामध्ये, तुम्ही जितके जागरूक आहात तितकेच जिवंत आहात. तुमच्यासाठी जागरूकता म्हणजेच जिवंतपणा आहे.

कारण जीवनाचा अनुभव असा आहे; की केवळ ज्या गोष्टीबद्दल तुम्ही जागरूक आहात, तीच तुमच्यासाठी अस्तित्वात असते, बाकीचे सर्व काही तुमच्यासाठी अस्तित्वात नाही. मग इथे काहीही उपस्थित असो, तुम्ही त्याबद्दल जागरूक नसाल, तर ते तुमच्यासाठी अस्तित्वात नाही.

जागरूकता म्हणजेच जिवंतपणा होय. पण कुठलेही बाह्य उत्तेजक तुमचा जिवंतपणा किंवा तुमची जागरूकता कमी करतात. म्हणूनच लोक म्हणतात की दारू पिऊन गाडी चालवू नये - कारण ती तुमची जागरूकता कमी करते.

तुम्ही पूर्णपणे जागरूक झालात, तर इथे केवळ सृष्टीचा एक छोटासा तुकडा, किंवा हाडामांसाचा एक छोटा प्राणी म्हणून अस्तित्वात न राहता, तुम्ही साक्षात सृष्टिकर्ता म्हणून जगू शकता. ही निवड तुमची आहे की, तुम्हाला इथे फक्त सृष्टीचा एक लहानसा तुकडा म्हणून राहायचे आहे की साक्षात सृष्टिकर्त्याच्या रूपाने जगायचे आहे.

तुम्हाला सृष्टिकर्त्याच्या रूपाने जगायचे असेल, तर तुमच्या जागरूकतेच्या विस्तार झाला पाहिजे. तुमचे नैराश्य, दुःख, मानसिक गोंधळ, मद्यपान, आणि इतर सर्व काही तुमची जागरूकता खाली आणत आहे. तुम्ही फक्त थोडेफार सुख शोधत असाल, तर मी काही त्याच्या विरोधात नाही.

तुम्ही सुखाच्याच शोधात असाल, आणि तुम्हाला आणखी मोठे सुख मिळण्याची संधी असेल, तर तुम्हाला आवडेल की नाही? तुम्हाला सदैव नशेत धुंद असूनही पूर्णपणे सजग राहता आले, तर तुम्हाला आवडेल की नाही? योगाचे विज्ञान तुम्हाला अशाच कितीतरी सखोल सुखापर्यंत पोहोचण्याचे साधन देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT