Prostate Cancer in Young Men sakal
आरोग्य

Prostate Cancer in Young Men: तरुणांमध्ये वाढतंय प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण? ही असू शकतात कारणं; तज्ज्ञांनी सांगितले सोपे उपाय

Why Prostate Cancer is Increasing in Younger Men: तरुणांमध्ये वाढणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याची कारणं, लक्षणं आणि टाळण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेले उपाय जाणून घ्या.

Anushka Tapshalkar

How to Prevent Prostate Cancer Naturally: एकेकाळी ज्याला वृद्ध वयातील समस्या मानलं जायचं, तो प्रोस्टेट कॅन्सर आज ३०-४० वयोगटातील तरुण पुरुषांनाही आपलं शिकार बनवत आहे. झपाट्याने बदलत चाललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि ताणतणाव यामुळे ही गंभीर समस्या आता लवकर वयातच डोके वर काढू लागली आहे. विशेष म्हणजे या आजाराची सुरुवात इतकी शांतपणे होते की अनेकदा लक्षणं लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पण योग्य काळजी घेतली, तर यावर मात करणं नक्कीच शक्य आहे.

प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय?

प्रोस्टेट ही ग्रंथी पुरुषांच्या प्रजनन संस्थेचा भाग असते, जी मूत्राशयाच्या खाली आणि मूत्रमार्गाभोवती असते. या ग्रंथीमधील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागल्या की प्रोस्टेट कॅन्सर होतो. काही वेळा हा हळूहळू वाढतो, पण काही प्रकरणांमध्ये तो जलद आणि गंभीर स्वरूपात पुढे जातो.

50 वर्षांखालील वयोगटातही धोका का वाढतोय?

डॉ. संदीप हरकर (युरोलॉजिस्ट, मणिपाल हॉस्पिटल, गुरुग्राम) यांच्या मते, तरुणांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर वाढण्यामागे काही महत्त्वाचे कारणं अशी आहेत:

  • चुकीची जीवनशैली

  • शरीराची हालचाल कमी

  • सतत फास्ट फूड, रेड मीट व प्रोसेस्ड फूडचं सेवन

  • धूम्रपान व मद्यपान

  • लठ्ठपणा

  • वंशपरंपरेत हा आजार असणं

  • प्रदूषण व हानिकारक रसायनांचा संपर्क

प्रोस्टेट कॅन्सरपासून बचावाचे ५ उपाय

- संतुलित आहार घ्या

फळं, भाज्या, नट्स, ऑलिव्ह ऑइल यांचा आहारात समावेश करा. रेड मीट आणि प्रोसेस्ड अन्न टाळा.

- दररोज सक्रिय राहा

चालणं, योग किंवा कुठलीही शारीरिक हालचाल नियमित करा.

- नियमित वैद्यकीय तपासणी

वय ५० च्या पुढे असाल, किंवा कुटुंबात कोणाला हा आजार झाला असेल, तर वेळोवेळी युरोलॉजिस्टकडून तपासणी करा.

- वजन नियंत्रित ठेवा

लठ्ठपणा टाळल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.

- शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष करू नका

लघवीस त्रास होणे, वारंवार लघवी लागणे याकडे वेळेत लक्ष देणं गरजेचं आहे.

उशिरा निदान झाल्यास धोका काय?

जर प्रोस्टेट कॅन्सर वेळेवर लक्षात आला नाही, तर तो शरीरात पसरू शकतो. अशावेळी संपूर्ण प्रोस्टेट ग्रंथी, सभोवतालचं ऊतक किंवा लिम्फ नोड्स काढावे लागतात. काही वेळा हार्मोन थेरपी, रेडिएशन किंवा टेस्टिस काढण्याचीही गरज भासू शकते. त्यामुळे वेळेवर निदान आणि उपचार आवश्यक आहेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi Speech Live Update : देशाच्या स्वातंत्र्याचे १०० वर्ष पूर्ण होईल, तेव्हा भारत अणुउर्जा क्षेत्रात १० पट पुढे असेल - पंतप्रधान मोदी

Independence Day 2025 : पंतप्रधान मोदींचे राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, लाल किल्ल्यावर १२ व्यांदा तिरंगा फडकवला

Solapur Monsoon Update: साेलापुरला मुसळधार पावसाचा इशारा! 'हिप्परगा तलाव फुल्ल, प्रवाह मंदावला'; सांडव्यातून ४०० क्युसेकचा विसर्ग

Child Daycare Tip: मुलांना डे-केअरमध्ये पाठवताय? तर पालकांनी ह्या प्रकारे घ्या सुरक्षेची काळजी

वेतन अधीक्षकांचे आदेश! ‘ही’ कागदपत्रे नसलेल्या शिक्षकांचा थांबणार पगार; ऑगस्टच्या पगारबिलासोबत मुख्याध्यापकांना जोडावी लागणार सर्वांची कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत

SCROLL FOR NEXT