blindness google
आरोग्य

अंधत्व आल्यानंतर ५ वर्षांनी परतली दृष्टी; ३८ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

या स्थितीत डोळ्यांना मेंदूशी जोडणारे ऑप्टिक मज्‍जातंतू खराब होतात, ज्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो.

नमिता धुरी

मुंबई : डोंबिवली येथील रहिवासी ३८ वर्षीय दीपिका पाटीलने मेंदूच्या उतींमधील द्रवपदार्थ वाढवणार्‍या इंट्राक्रॅनियल प्रेशरमध्ये अस्पष्ट वाढ असलेली स्थिती क्रॉनिक पॅपिलोएडेमा असल्याचे निदान झाल्यानंतर सर्व आशा गमावल्या होत्या. या स्थितीत डोळ्यांना मेंदूशी जोडणारे ऑप्टिक मज्‍जातंतू खराब होतात, ज्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो.

वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्‍ये येण्‍यापूर्वी दीपिकाची दृष्टी गेली होती. हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांची टीम – कॉर्निया, ऑक्‍यूलर सरफेस व रिफ्रॅक्टिव्‍ह सर्जरीचे सल्‍लागार डॉ. हर्षवर्धन घोरपडे आणि ऑक्‍युलोप्‍लास्‍टी व ग्‍लूकोमाचे सल्‍लागार डॉ. सुनील मोरेकर यांनी तिच्यावर उपचार केले. 

रुग्ण दिपिकाने तिची दृष्टी अंधूक होण्‍यासोबत हळूहळू कमी होत असल्‍याकारणाने अनेक नेत्ररोग तज्ञांना भेट दिली. बहुतेक डॉक्टरांनी तिला सांगितले की, ऑप्टिक मज्‍जातंतूला दुखापत झाल्‍यामुळे चष्मा किंवा लेन्सच्या मदतीने तिची दृष्टी सुधारणे शक्य नाही.

इतर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सुचवले की, इंट्राक्रॅनियल प्रेशर कमी करण्यासाठी वैद्यकीय उपचारांमुळे तिच्या ऑप्टिक मज्‍जातंतूवरील दबाव तात्पुरता कमी होईल. इंट्राक्रॅनियल प्रेशर (आयसीपी) हा कवटीच्या आत आणि मेंदूच्या उतींवर सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (सीएसएफ) सारख्या द्रवपदार्थांचा दबाव असतो.

पण, इंट्राक्रॅनियल प्रेशर कमी करण्यासाठी इतर हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या वैद्यकीय उपचारांचे गंभीर दुष्परिणाम झाले. अॅसिडटील व कमकुवतपणा आणि मूत्रपिंडाचे कार्य कमी झाल्‍यामुळे तिचे आरोग्य आणखी बिघडले आणि दैनंदिन जीवनावर परिणाम झाला.

तिने औषधे घेणे बंद केले, ज्यामुळे ऑप्टिक मज्जातंतूंचे आणखी नुकसान झाले आणि ९५ टक्के दृष्टी कमी झाली. बिघडत चाललेली तब्येत आणि दृष्टी कमी झाल्यामुळे तिला तिची दैनंदिन कामे करणे कठीण झाले. तसेच ती स्‍वत:च्‍या १० वर्षाच्या मुलीची काळजी देखील घेऊ शकत नव्‍हती.

फोर्टिस हॉस्पिटल वाशी येथील ऑफ्थॅल्‍मोलॉजी सल्‍लागार डॉ. हर्षवर्धन घोरपडे म्‍हणाले, "इडिओपॅथिक इंट्राक्रॅनियल हायपरटेन्शनमुळे पॅपिलोएडेमा २५ ते ४५ वर्षे वयोगटातील मध्यमवयीन लोकांना होतो.

ही स्थिती विविध कारणांमुळे असू शकते - हार्मोनल बदल, साइड इफेक्ट्स. औषधोपचार, मेंदूतील काही साठ्यांची निर्मिती, लठ्ठपणा इत्यादी. अशा केसेसमध्ये रुग्णांना सहसा डोकेदुखी, अंधुक दृष्टी आणि उलट्या यांसारखी लक्षणे जाणवतात, जी दिवसेंदिवस गंभीर होऊ शकतात." 

डॉ. घोरपडे पुढे म्‍हणाले, "या केसमधील रुग्णाला अधूनमधून डोकेदुखीचा त्रास होत होता. दाब कमी करण्यासाठी मेंदू व पोट शंट ट्यूबद्वारे जोडून न्यूरोसर्जरी करण्याचा पर्याय आमच्याकडे होता. पण ही एक गुंतागूंतीची प्रक्रिया असल्याने आणि परिणाम निश्चित नसल्यामुळे आम्ही ट्रान्सकॉन्जंक्टीव्हल ऑप्टिक नर्व्ह फेनेस्ट्रेशन सर्जरीचा पर्याय निवडला.

या शस्‍त्रक्रियेत चेहऱ्याच्या पुढच्या बाजूने थेट मज्जातंतूंकडे जाता येते, म्हणजे डोळ्यांमधील ऑप्टिक मज्जातंतूपर्यंत पोहोचता येते. त्यानंतर मज्जातंतूंमध्ये एक छिद्र बनवून द्रव वाहण्यासाठी जागा तयार केली जाते. शेवटी इंट्राक्रॅनियल प्रेशर कमी होतो. अशा प्रकारे रुग्णाला त्यांची दृष्टी परत मिळवण्यास मदत होते आणि डोकेदुखी देखील कमी होते."

शस्त्रक्रियेच्या दिवशीच दीपिकाला डिस्चार्ज देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर तिची डोकेदुखी थांबली आणि दुसर्‍याच दिवसापासून तिची दृष्टी परत येऊ लागली. फॉलो-अप वैद्यकीय तपासणीमधून असे दिसून आले की, ऑप्टिक मज्जातंतूची सूज लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. रुग्णाची दृष्टी सुधारली असून तिला तीन मीटरपर्यंतचे दिसू शकते आणि ती आता चेहरे देखील ओळखू शकते.

रुग्ण दीपिका पाटील म्हणाली, "मी माझी दृष्टी परत येण्याच्‍या आणि सामान्य जीवन जगण्याच्‍या सर्व आशा गमावल्‍या होत्‍या. शस्त्रक्रियेमुळे मी पाच वर्षांनी माझ्या पतीला, मुलीला पाहू शकले. गेली पाच वर्षे माझ्यासाठी अंधकारमय ठरली, ज्‍यामुळे त्‍यांचे चेहरे पाहताच मला खूप आनंद झाला. मी फोर्टिस वाशी येथील डॉक्टरांचे आभार मानते, ज्‍यांनी मला योग्य उपचार करून दुसरे जीवन दिले.’’ 

रुग्णाची शस्त्रक्रियेनंतरची तपासणी सुरू राहील, ज्‍यामुळे पुढील तीन महिन्‍यात दृष्‍टी सुधारेल. इडिओपॅथिक इंट्राक्रॅनियल हायपरटेन्शन व पॅपिलोएडेमासाठी ट्रान्सकॉन्जेक्टिव्हल ऑप्टिक नर्व्ह फेनेस्ट्रेशन सर्जरी ही कमीत-कमी इनवेसिव्ह शस्‍त्रक्रिया आहे, ज्यामुळे गेलेली दृष्टी परत मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना समन्स बजावले, हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Shirpur Election : काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपमय! अमरीशभाई पटेलांच्या नेतृत्वाखालील भाजप स्वबळावर ठाम

Latest Marathi News Live Update : ऊस दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांना धक्काबुक्की

Ranji Trophy 4th Round: मुंबईची दणक्यात सुरुवात, मुशीर खान, सिद्धेश लाडची शतकं; महाराष्ट्राविरुद्ध कर्नाटकच्या अडीचशे धावा पार

Thane News: तातडीने उपाययोजना न झाल्यास भटके कुत्रे महापालिकेत सोडू, ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा; प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT