Summer Care esakal
आरोग्य

Summer Care : उन्हापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना गॉगल आणि हेल्मेटचा करा वापर

Summer Care : एप्रिलची सुरवात झाली असून, उन्हाची प्रखरता वाढली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना कडक उन्हामुळे त्वचेचे दुष्परिणाम जाणवत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Summer Care : कडक उन्हामुळे अनेकांना त्वचेच्या आजारांची समस्या भेडसावत आहे. त्वचाविकारांचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी उन्हात घराबाहेर पडताना त्वचेचे आरोग्य जपण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

एप्रिलची सुरवात झाली असून, उन्हाची प्रखरता वाढली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना कडक उन्हामुळे त्वचेचे दुष्परिणाम जाणवत आहेत. उन्हामुळे घाम येऊन घामातील खारट द्रवांमुळे ग्रंथीची नलिका सुजणे व घामोळ्या, पुरळ येणे असे प्रकार घडत आहेत.

उन्हामुळे अ‍ॅलर्जीत वाढ झाली आहे. अंगावर लाल चट्टे उठणे, चक्कर येणे, डोके दुखणे, डोळे चुरचुरणे यांसारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अनेकांनी सायंकाळच्या वेळीच घराबाहेर पडणे पसंत केले आहे.

उन्हाळ्यात गजकर्णसारखे त्वचेचे आजार होतात. घामामुळे पट्ट्याची, दागिन्यांची, चपलांची अ‍ॅलर्जी होते. उन्हामुळे कातडी काळी पडणे, स्त्रियांमध्ये चेहऱ्यावर वांग पडणे या तक्रारी वाढत आहेत.

डिहायड्रेशनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. दुपारी घराबाहेर जाण्याचे टाळावे, सुती कपड्याचा वापर करावा. छत्री, टोपी, गॉगल्सचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे, मसाल्याचे पदार्थ टाळावेत, ताक, सरबत, फळे यांचा वापर करावा. मोकळ्या हवेच्या ठिकाणी बसावे एसीतून बाहेर पडल्यावर लगेच उन्हात जाऊ नये. घराबाहेर पडता गॉगल व हेल्मेटचा वापर करून उन्हापासून संरक्षण करता येते. तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. परस्पर उपचार घेणे टाळावे.

- डॉ. अनिरुद्ध लोंढे, एम. डी. जनरल मेडिसीन, पैठण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT