Superwoman Syndrome esakal
आरोग्य

Superwoman Syndrome : महिलांनो, परफेक्ट बनण्याच्या नादात तुम्हीपण 'या' आजाराला बळी तर पडत नाही ना?

जेव्हा जबाबदाऱ्या निभावताना महिला कुठे कमी पडू लागते तेव्हा ती या सिंड्रोमची बळी ठरते.

धनश्री भावसार-बगाडे

World Health Day 2023 Superwoman Syndrome Symptoms : स्त्री दिवसभरात वेगवेगळ्या भूमिका सातत्याने निभावत असते. कधी आई, कधी बायको, कधी सून, कर्मचारी अशा अनेक भूमिका एकाचवेळी निभावत ती तारेवरची कसरत करत असते. यासोबतच तिला स्वतः विषयीची जबाबदारीपण पूर्ण करायची असते. या सगळ्यात ती पार दमून जाते. पण या सर्व कामात आणि धावपळीत अडकलेली स्त्री जेव्हा एखादं काम नीट करू शकत नाही तेव्हा ती सुपर वूमन सिंड्रोमची बळी ठरते.

हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. जो सर्वच परफेक्ट करण्याच्या नादात असणाऱ्या महिलांमध्ये दिसतो. परफेक्शनीस्ट होण्याचा अट्टाहास महिलांना याला बळी पाडतो.

काय आहे हा सिंड्रोम?

हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. जो प्रत्येक ठिकाणी परफेक्ट असावं असं वाटणाऱ्या महिलांना तसं न जमल्याने आत्मग्लानीने भरून टाकतो. घर, कुटुंब, ऑफीस, सोशल लाइफ अशा सगळ्याच जबाबदाऱ्या नीट निभावण्याच्या नादात महिलांना बऱ्याचदा हा सुपर वूमन सिंड्रोम होतो.

महिला जेव्हा एखादी जाबाबदारी निभवताना कोणती गोष्ट परफेक्ट करू शकली नाही की, ती स्वतःला दोषी ठरवायला लागते. एवढच नाही तर परफेक्ट बनण्याच्या नादात ती डिप्रेशनमध्ये जाते.

Superwoman Syndrome

सुपर वूमन सिंड्रोमची लक्षण

  • खूप थकवा जाणवणं

  • प्रत्येक अपयशामागे स्वतःला दोषी ठरवणं.

  • अनिद्रा, शांत झोप नसणे.

  • पुन्हा पुन्हा डोके दुखी, मायग्रेन होणं

  • चिंता, ताण.

  • एकाग्र होणे आणि निर्णय घेण्यात अडचणी येणे.

  • आराम करणे, रिकाम्या वेळेचा आनंद घेण्यात असमर्थ

  • कामासाठी स्वतः कडे लक्ष देणं.

Superwoman Syndrome

याची कारणं

डॉक्टरांच्या नुसार या सिंड्रोमचं कारण सेरोटोनिन हार्मोनची कमी असू शकते. ज्यामुळे महिलांमध्ये ताण आणि त्यातून येणाऱ्या समस्या वाढतात.

काळजी काय घ्यावी

घर कुटुंब आणि ऑफीस बरोबर स्वतःसाठीही वेळ काढावा.

नाही म्हणायला शिकावे

कायमच सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. नाहीसुद्धा म्हणता यायला हवं. यामुळे वर्क लोड आणि ताण कमी करू शकाल.

कामं वाटून घ्या

प्रत्येक काम स्वतः करणं गरजेचं नाही. कामाची सिस्टीम लावत वाटून घ्या.

प्राधान्य कशाला ते ओळखा

आयुष्यातले ते घटक शोधा जे तुमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. दिवसाची सुरुवात आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टीने करा. सगळी कामं तुम्ही एकाचवेळी करू शकत नाही हे मान्य करून जाबाबदाऱ्या दूर करायलाही शिका.

स्वतःला वेळ द्या

शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी वेळ काढा. अशा गोष्टी करा ज्यातून तुम्हाला आतून शांत आणि आनंदी वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Akbar: महिलेचं अपहरण करणं मुघलांना पडलं होतं महागात! औरंगजेबच्या पणजोबाची कबर खोदून हाडं कोणी जाळली?

Latest Marathi Breaking News : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील अमीर रशीद अलीची १० दिवसांची कोठडी एनआयएकडे

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

SCROLL FOR NEXT