खाद्यतेलाचा पुनर्वापर करताय! जाणून घ्या गंभीर परिणाम esakal
आरोग्य

खाद्यतेलाचा पुनर्वापर करताय! जाणून घ्या गंभीर परिणाम

खाद्यतेलाचा पुनर्वापर करताय! जाणून घ्या गंभीर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

एकदा तळलेले खाद्यतेल पुन्हा वापरले तर त्यातील पोलर कंपाउंडचे व ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढून ते आरोग्यावर विपरीत परिणाम करते, तसेच...

सोलापूर : जिल्हा व शहरातील सर्व अन्न व्यावसायिकांनी खाद्यपदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा (Edible Oil) जास्तीत जास्त दोन वेळा वापर करून संपवावे. जर ते आपण पुन्हा तळण्यासाठी वापरले तर त्यातील पोलर कंपाउंडचे (Polar Compound) व ट्रान्सफॅटचे (Transfat) प्रमाण वाढून ते आरोग्यावर विपरीत परिणाम करते. त्यामुळे तेलाचा पुनर्वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे (Food and Drug Administration) सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदीपकुमार राऊत (Pradeepkumar Raut) यांनी दिला आहे. (The Food and Drug Administration has imposed restrictions on oil recycling)

अन्नपदार्थ तळण्यासाठी तेलाचा पुनर्वापर केल्यामुळे हृदयविकार (Heart Disease), कर्करोगासह (Cancer) पचनक्रियेसंबंधी विकारांचा (Digestive Disorders) धोका वाढत आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर करताना गॅस हा कमी आचेवर ठेवावा, जेणेकरून तेलामधून धूर येणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच तळण्यासाठी शक्‍यतो स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा. लोखंडी कढईचा वापर टाळावा. तळताना तेलात जमा झालेले अन्नकण हे वारंवार तळून काळे होण्यापूर्वी लगेचच काढावेत.

दररोज 50 लिटरपेक्षा अधिक तेलाचा वापर करीत असलेल्या व्यावसायिकांनी तेल साठ्याबाबत नोंद ठेवणे बंधनकारक आहे. असे साठविलेले खाद्यतेल केंद्रीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांची मान्यता असलेल्या बायोडिझेल उत्पादक कंपनी आणि त्यांचे स्थानिक प्रतिनिधी चॅनल पार्टनर यांना देणे बंधनकारक आहे. वापरण्यास अयोग्य खाद्यतेल बायोडिझेल उत्पादक कंपनीला दिल्याबद्दल या कंपनीमार्फत अन्न उत्पादक व्यावसायिकांना शासन नियमाप्रमाणे तेलाची रक्कम देण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी यू. एन. आय. सर्व्हिसेस यांची स्थानिक प्रतिनिधी म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यांचा दूरध्वनी क्र. 0231-2627007 असा आहे. तसेच वापरून शिल्लक राहिलेल्या तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकाला दिले यासंबधी पूर्ण नोंदी ठेवणे आवश्‍यक आहे. तेलाचा पुनर्वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदीपकुमार राऊत यांनी दिलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT