Benefits of Brinjal  esakal
आरोग्य

Benefits of Brinjal : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात वांगी, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

वांग्यामध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Brinjal : आपल्या आहारात विविध प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचा समावेश असणे हे फार महत्वाचे आहे. हिरव्या पालेभाज्यांसोबतच फळभाज्या देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

वांग्याची भाजी ही सर्वांना आवडतेच असे नाही. अनेकांना वांगी खायला आवडत नाहीत. मात्र, जे लोक वांगी खातात त्यांना याचे अनेक फायदे मिळतात. कारण, वांगी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत.

वांग्यामध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर आढळून येते. व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि खनिजांनी समृद्ध असलेली वांगी आपल्या आहारात असायलाच हवीत. ज्या लोकांना वांग्याची अ‍ॅलर्जी आहे, अशा लोकांनी वांगी खाणे टाळायला हवीत.

वांग्याचे आरोग्यदायी फायदे

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते

वांग्यांचा आहारात समावेश असल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. वांग्यामध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर आढळून येते. फायबर हे आपल्या रक्तातील साखरेचे पचन आणि शोषणाचा वेग कमी करण्याचे काम करू शकते.

त्यामुळे, रक्तातील साखरेची पातळी आणि क्रॅश टाळण्याचे काम वांगी करते. त्यामुळे, ज्या लोकांना मधुमेह आहे अशा, लोकांनी त्यांच्या आहारात वांग्यांचा जरूर समावेश करावा.

हृदयासाठी फायदेशीर

वांगी खाणे हे आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरते. वांग्यामध्ये असलेले क्लोरोजेनिक अ‍ॅसिड आढळून येते. हे अ‍ॅसिड शरीरातील खराब कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे काम करते आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यात मदत करते.

तसेच, वांग्यामध्ये असलेले फायबर्स कॉलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब कमी करण्याचे काम करते.

हाडांना मिळते बळकटी

वांगी खाल्ल्यामुळे मेंदूच्या विकासाला चालना मिळते. यासोबतच हाडांच्या विकासासाठी आणि मजबूतीसाठी वांगी फायदेशीर ठरतात. वांग्यामध्ये आढळून येणारे फेनोलिक नावाचे संयुग हाडांना बळकटी प्रदान करते आणि हाडांची मजबूती वाढवते.

हाडांसोबतच वांगी आपल्या डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहेत. वांगी खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे, दृष्टीदोष किंवा डोळ्यांच्या समस्या असणाऱ्या लोकांनी वांग्यांचा आहारात जरूर समावेश करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अन् अण्‍णासाहेब डांगे यांचा प्रवेश; नेमका काय योगायोग?

Sikkim Nomad Village: ‘डिजिटल नोमॅड व्हिलेज’ची सुरूवात सिक्कीममध्ये; याकतेन गावातून ग्रामीण पर्यटनाला नवा प्रवास

स्वच्छतेबाबतीतली समाजातली अनास्था दाखवणाऱ्या 'अवकारीका' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पथनाट्याने रंगला सोहळा

Menstrual Pain Relief: मासिक पाळीत वारंवार त्रास होतोय? तूप-पाणी आणि 'ही' 4 योगासने देतील नैसर्गिक आराम

'संत्या या गोष्टी सोडून दे' विकी कौशलने दिला संतोष जुवेकरला सल्ला! ट्रोलिंगवर म्हणाला, "संत्या तू आमच्यापेक्षा...."

SCROLL FOR NEXT