Energy  sakal
आरोग्य

Food For Instant Energy : बसल्या जागीसुद्धा थकवा जाणवतोय? हे 6 पदार्थ देतील इन्स्टंट एनर्जी

तुम्हालाही ऑफिसमध्ये बऱ्याचदा थकवा जाणवतो का? जाणवत असल्यास तुम्ही आजच हे ६ पदार्थ खायला सुरुवात करायला हवी

साक्षी राऊत

Food For Instant Energy : धावपळीच्या जीवनात हल्ली आराम करायल पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी बऱ्याच लोकांचे आरोग्याकडे दूर्लक्ष होते. काहींना ऑफिसच्या वेळेत अगदी बसल्या जागीसुद्धा थकवा जाणवतो. तुम्हालाही ऑफिसमध्ये बऱ्याचदा थकवा जाणवतो का? जाणवत असल्यास तुम्ही आजच हे ६ पदार्थ खायला सुरुवात करायला हवी. हे पदार्थ तुम्हाला देतील इस्टंट एनर्जी.

ज्वारी

ज्वारी हा कडधान्याचा एक प्रकार आहे. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटिन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला इस्टंट ऊर्जा मिळते.

Food For Instant Energy

केळी

केळीचे अनेक आरोग्यदायी फायदे डॉक्टरसुद्धा आपल्याला सांगत असतात. केळी हे फ्रुक्टोज, ग्लुकोज आणि सुक्रोज सारख्या नॅचरल शुगरचा उत्तम स्रोत आहे, ज्याच्या सेवनाने तुम्हाला इस्टंट एनर्जी मिळते.

Food For Instant Energy

ड्राय फ्रूट्स

ड्राय फ्रूट्समध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या स्नायूंचा कमकुवतपणा दूर होतो आणि ते मजबूत होतात. ते खाल्ल्याने तुम्हाला इस्टंट एनर्जी मिळते.

Food For Instant Energy

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये लोह आणि मॅग्नेशियमसह आवश्यक पोषक घटक असतात, ज्यामुळे तुम्हाला इस्टंट एनर्जी मिळते. हिरव्या पालेभाज्या खाण्याचे आणखी सुद्धा बरेच आरोग्यदायी फायदे आहेत. (Vegetables)

Food For Instant Energy

ओट्स

ओट्स हा एकप्रकारे कार्बोहायड्रेट्सचाच सोर्स आहे. जे तुम्हाला दिवसातील संपूर्णवेळ थोड्य थोड्या वेळात एनर्जी पुरवत असते. यात फायबर आणि व्हिटामिन बी सुद्धा अधिक प्रमाणात असते. (Energy)

ग्रीक योगर्ट

ग्रीक योगर्टमध्ये दह्याचे प्रमाण जास्त असते, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते आणि ऊर्जा प्रदान करते. यात बी जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असते. तेव्हा तुमच्या रोजच्या जेवणात त्याचा समावेश असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर कच्चे तेल महागले; आता पेट्रोल-डिझेल कितीला? महाराष्ट्रातील शहरनिहाय नवे दर जाहीर

Shaktipeeth Highway Drone Survey : ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी विठ्यात ‘ड्रोन सर्व्हे’, शेतकऱ्यांनी प्रशासनाला दाखवला हिसका; सांगलीत वातावरण तापलं

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ' प्रशासक नियुक्तीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर आज सुनावणी

Pakistan Occupied Kashmir: पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणाव शिगेला; धुमश्‍चक्रीत ११ जणांचा मृत्यू, ब्रिटिश खासदारांकडून चिंता व्यक्त

Maharashtra Education : चौथीच्या पुस्तकात मोठा बदल! छत्रपती शिवरायांच्या इतिहासासोबतच जोडले 'हे' खास पान; संत, थोर समाजपुरुषांच्या कार्यांची विद्यार्थ्यांना होणार ओळख

SCROLL FOR NEXT