Ujjayi Mudra sakal
आरोग्य

उज्जायी मुद्रा ध्यान

उज्जायी हा एक प्राणायामाचा प्रकार आहे. संस्कृत भाषेत ‘उज्’ हा धातू आहे. त्याचा अर्थ उंच असा आहे.

सकाळ वृत्तसेवा

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

उज्जायी हा एक प्राणायामाचा प्रकार आहे. संस्कृत भाषेत ‘उज्’ हा धातू आहे. त्याचा अर्थ उंच असा आहे. या धातूवरूनच उच्च, उंच असे शब्द तयार झालेले आहेत. ‘जायी’ म्हणजे जाणे.

या प्राणायामामध्ये, श्वास घेताना आणि सोडताना घशाला घासत घेतला जातो. यामुळे घर्षणयुक्त नाद निर्माण होतो. (झोपेत घोरल्यासारखा हा आवाज असतो.) या प्रभावी प्राणायामाच्या जोडीने काही मुद्राही या ध्यानात करायच्या असतात.

मुद् या संस्कृत भाषेतील धातूपासून मोद हा शब्द तयार झाला आहे. मोद म्हणजे आनंद. मुद् आणि रा या दोन्हीतून तयार झालेला शब्द म्हणजे मुद्रा.

आपण उज्जायी श्वसनाबरोबर चार मुद्रा करणार आहोत. चिन् मुद्रा, चिन्मय मुद्रा, आदी मुद्रा आणि मेरुदंड मुद्रा. पहिल्या तीनही मुद्रांमध्ये, म्हणजेच चिन्, चिन्मय आदी मुद्रांमध्ये हात गुडघ्यांवर ठेवावेत. तळहातांची दिशा आकाशाकडे असावी.

चिन् मुद्रा : अंगठा आणि त्या शेजारचं बोट (तर्जनी) गोलाकार वळवून, त्यांची टोकं अगदी अलगद एकमेकांना स्पर्श होतील अशी ठेवावीत. राहिलेली तीन बोटं सरळ (पण ताठरता नको) ठेवावी. अंगठा आणि तर्जनी यांचा अगदी हलका स्पर्श होऊ द्यावा.

चिन्मय मुद्रा : आधी चिन् मुद्रा करावी. मग अंगठा आणि तर्जनी सोडून, राहिलेली तीन बोटं, मूठ मिटतो तशी अलगद आतल्या बाजूला वळवावी. यातही, हात गुडघ्यांवर ठेवून तळहातांची दिशा आकाशाकडे ठेवावी.

आदी मुद्रा : आदी मुद्रा करताना, आधी अंगठा आत वळवून मग त्याच्यावर चारी बोटं मिटलेली, अशा प्रकारे अलगद मूठ मिटावी. हात गुडघ्यांवर ठेवून तळहातांची दिशा आकाशाकडे ठेवावी.

मेरुदंड मुद्रा : हातांच्या अलगद मुठी वळून, गुडघ्यांवर उभ्या ठेवाव्यात. अंगठे सरळ (पण ताठरता नको) आणि आकाशाच्या दिशेने रोखलेले ठेवावेत.

उज्जायी प्राणायाम आणि मुद्रा या संकल्पना आपण पाहिल्या. आता, हे ध्यान कसं करायचं, ते बघू या.

उज्जायी मुद्रा पद्धत

आपल्याला सुखकारक होईल अशा आसनात बसावं. दोन्ही हातांची चिन् मुद्रा करावी. उज्जायी प्राणायामाची दोन आवर्तनं करावी.

आवर्तन म्हणजे काय?

चार सेकंदांत श्वास घेणे, घेतलेल्या स्थितीत दोन सेकंद रोखणे, घशाला घासत सहा सेकंदांत श्वास सोडणे, सोडलेल्या स्थितीत दोन सेकंद श्वास रोखणे.

अशा प्रकारे चिन्, चिन्मय, आदी आणि मेरुदंड अशा चारही मुद्रांमध्ये प्रत्येकी दोन आवर्तनं करावी. म्हणजे चार मुद्रांमध्ये मिळून एकूण आठ आवर्तने होतील.

चिन् मुद्रेमुळे प्राणशक्तीचं वहन शरीराच्या कनिष्ठ भागामध्ये (कंबरेपासुन पायाच्या बोटांपर्यंत) प्रभावीपणे होऊ लागतं. चिन्मय मुद्रेत मध्य भागात (गळ्यापासून कंबरेपर्यंत), तर आदी मुद्रेत ज्येष्ठ भागात (टाळूपासून गळ्यापर्यंत) प्राणशक्तीचं वहन सुधारतं. मेरुदंड मुद्रा करताना प्राणशक्तीचा सुषुम्ना नाडीतून (म्हणजेच मध्यनाडीतून) वाहणारा प्रवाह वाढतो.

आठ आवर्तनं पूर्ण झाल्यावर डोळे मिटून शांतता अनुभवत ध्यान करावं. या ध्यानामुळे शरीरातील ७२००० नाड्यांमधील प्राणशक्तीचा प्रवाह वाढतो. त्यामधले अडथळे दूर होतात. ही प्राणशक्ती प्रत्येक पेशीपर्यंत जाऊन पोचते. प्रत्येक पेशीला नवसंजीवन, चैतन्य प्राप्त होतं. प्रत्येक पेशीच्या पातळीवर एक प्रशांत अशी अवस्था निर्माण झालेली असल्याने सहजपणे ध्यानाला अनुकूल अशी स्थिती निर्माण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुन्हा आवाहन, आर्थिक सल्लागार परिषद बैठकीत चर्चा

Success Story : चूल आणि मूल सोडून उभा केला कोट्यवधींचा 'देहाती' ब्रॅंड! ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनतेय हे गाव

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 जून 2026

आजचे राशिभविष्य - 07 जून 2026

Taj Viral Video : ताजमहालच्या हौदात माकडांची धम्माल 'पूल पार्टी'! व्हिडिओ व्हायरल होताच पर्यटकांची गर्दी; अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT