Khichadi Sakal
आरोग्य

हेल्थ वेल्थ : उपवासाचे फायदे

श्रावणात लोक उत्साहाने उपवास करतात. अनेकांसाठी, श्रावण हा उपवास आणि डिटॉक्सचा महिनाभराचा प्रवास असू शकतो, जो आता संपला आहे.

सकाळ वृत्तसेवा

श्रावणात लोक उत्साहाने उपवास करतात. अनेकांसाठी, श्रावण हा उपवास आणि डिटॉक्सचा महिनाभराचा प्रवास असू शकतो, जो आता संपला आहे.

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

श्रावणात लोक उत्साहाने उपवास करतात. अनेकांसाठी, श्रावण हा उपवास आणि डिटॉक्सचा महिनाभराचा प्रवास असू शकतो, जो आता संपला आहे. उपवासाचे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला पुढील वर्षी श्रावण परत येण्याची वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांशी तडजोड न करता तुम्ही उपवासाचे वेळापत्रक तयार करू शकता जे तुमच्या आहारासाठी सर्वांत योग्य आणि तुम्हाला फायदेशीर ठरेल. परंतु प्रथम उपवास केल्याने किती फायदा होतो आणि उपवासाचे काही तोटे आहेत का ते समजून घेऊया.

गणेश चतुर्थी, नवरात्री, ओनम, दिवाळी इ. सारखे अनेक सण साजरे करण्याचे हे दिवस आहेत आणि या उत्सवात अनेकदा गोड आणि इतर अनेक बरेच पदार्थ खाल्ले जातात. त्यापैकी बहुतेक पुरी, पकोडे इत्यादी तळलेले पदार्थ असतात. या सर्व अतिरिक्त कॅलरीज तुमच्या शरीरात चरबीच्या रूपात जमा होऊ शकतात. परंतु आपण याबद्दल काहीतरी करू शकता. तुम्ही उपवास करून चरबी शरीरात साठण्यापासून रोखू शकता.

तुम्ही उपवास करण्याचा निर्णय घेता तेव्हा कमी कॅलरी खाण्याचा प्रयत्न करता आणि कमी कॅलरी खाता तेव्हा कमी कॅलरी किंवा चरबी साठवता, इतकं सोप्प आहे! परंतु, तुम्ही उपवास करत असतानाही, तुमच्या शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषणतत्त्वे, प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे इ. देत आहात याची खात्री करणे आवश्यक आहे. आणि उपवास करून तुम्हाला स्वतःला त्रास होत नाही याची खात्री करण्यासाठी, तुम्हाला उपवासाचे योग्य वेळापत्रक निवडणे आवश्यक आहे जे तुमच्यासाठी सर्वांत योग्य आहे.

उपवासाचे विज्ञान

आपण उपवास करत नसतो तेव्हा काय होते? मुळात तुम्ही नेहमीप्रमाणे खाता. जे काही खाता त्यातून तुम्हाला दैनंदिन कार्ये जसे की चालणे, धावणे किंवा बोलणे आणि खाण्यासाठी तुमच्या जबड्याचे स्नायू वापरणे यासारख्या विविध क्रिया करण्यासाठी ऊर्जा मिळवता. तुमचे शरीर अन्नामध्ये आढळणारे कर्बोदके ऊर्जेसाठी लागणाऱ्या ग्लुकोजमध्ये बदलते. आपल्या शरीराला ग्लुकोजपासून ऊर्जा मिळवणे सोयीचे वाटते. आता तुम्ही उपवास करता तेव्हा नक्की काय होते?

तुम्ही उपवास करता आणि दीर्घकाळ काहीही खाणे किंवा पिणे टाळता तेव्हा तुमचे शरीर ऊर्जेसाठी ग्लुकोजवर अवलंबून राहू शकत नाही, कारण श्वास घेणे, रक्त पंप करणे यासारखी महत्त्वाची कार्ये करण्यासाठी तुमच्या शरीरात ते पुरेसे नसते. शरीर ऊर्जेसाठी चरबी तोडण्यास सुरवात करते. आणि उपवासाचा हा गुणधर्म वजन कमी करण्यासाठी एक चांगली रणनीती बनतो. परंतु हा अल्पकालीन उपाय आहे. कारण ऊर्जेचा स्रोत म्हणून चरबीचा वापर करण्याची किंमत मोजावी लागते, त्यात काही धोके असतात. उपसावासाच्या धोक्याबरोबर फायदेही असतात. उपवासाचे कोणते मार्ग आहेत याबद्दल पुढील भागात माहिती घेऊयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT