Weight Loss Doesn't Give Fertility Benefits Says Study
Weight Loss Doesn't Give Fertility Benefits Says Study 
आरोग्य

वजन कमी केल्याने प्रेग्नेंट होण्याची शक्यता वाढत नाही, व्यायामाचा होतो फायदा

सकाळ डिजिटल टीम

Heavy Weight and Pregnancy Chances : सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, जास्त वजन असलेल्या महिलांना गर्भधारणा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आधीच त्यांना वजन कमी केले पाहिजे आणि त्यानंतर गर्भधारणेचा प्रयत्न केला पाहिजे पण अमेरिकेच्या यूनिवर्सिटी ऑफ वर्जिनियाच्या (UVA) संशोधकांना आपली एक नव्या संशोधनामध्ये आढळले आहे की, वजन कमी करण्यामुळे प्रजनन क्षमतेला कोणताही फायदा होत नाही. या अभ्यासानुसार, लठ्ठपणामुळे त्रस्त 379 महिलांना संशोधनामध्ये समाविष्ट केले होते, ज्या इंफर्टिलिटी( infertility) म्हणजेच वंध्यत्वच्या समस्यांचा सामना करत होत्या. या काळात असे दिसून आले की लाईफस्टाईलमध्ये बदल केल्याने ना त्यांची गर्भधारणेची शक्यता वाढली आणि निरोगी मुल जन्मामध्ये काही फरक पडला. पण वजन कमी न करता फक्त व्यायामामुळे(physicals Activity)त्यांना फायदा नक्कीच झाला. संशोधनच्या निष्कर्ष पीएलओएस मेडिसिन(PLOS Medicine) जर्नलमध्ये प्रकाशित केले आहेत. (Weight Loss Doesn't Give Fertility Benefits Says Study)

यूवीएच्या स्कूल ऑफ मेडिसिन सेंटर फॉर रिसर्च इन रिप्रोडक्शनच्या रिसर्चर डॅनिअल जे हॅसेंलेंडर यांनी सांगितले की, आम्ही कित्येक दशकांपासून ऐकत आलो आहोत की, लठ्ठ महिलांना गर्भधारणेच्यावेळी समस्या निर्माण होते. त्यामुळे कित्येक डॉक्टर गर्भधारणेपूर्वीच त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला देतात पण काही संशोधन असेही आहेत, ज्यामध्ये सांगितले आहे की, या समस्येचे समाधान व्यायाम आणि त्यासोबत लाईफस्टाईलमध्ये बदलामुळे फायदा होतो. या संदर्भात FIT-PLESE नावाच्या एका उपक्रमांतर्गत मेडिकल सेंटर्समध्ये संशोधन झाले होते.

कसे झाले संशोधन

स्टडीनुसार सहभागींना दोन गृपमध्ये वाटण्यात आले होते. अर्ध सहभागींना डाएटिंग सह औषधे देण्यात आली आणि त्यांच्या फिजिकल अॅक्टिव्हिटी वाढविण्यात आल्या. उरलेल्या अर्ध्या सहभागींना वजन कमी न करण्यासोबत फिजिकल अॅक्टिव्हिटीमध्ये वाढ केली. हा नियोजित कार्यक्रम पूर्ण झाल्यावर, दोन्ही गटांसोबत मानक वंध्यत्व उपचारांच्या तीन फेऱ्या देण्यात आल्या.

वजन कमी करणाऱ्या गटातील महिलांमध्ये, त्यांचे वजन सरासरी 7% ने कमी झाले, तर केवळ व्यायाम करणाऱ्या गटातील महिलांचे वजन सामान्य राहिले. याचा अर्थ त्यांच्या वजनात कोणतीही घट झाली नाही, परंतु अभ्यासाअंती असे आढळून आले की, दोन्ही गटातील महिलांच्या प्रकृतीमध्ये मुलाला जन्म देताना विशेष फरक पडला नाही. 16 आठवड्यांच्या वजन कमी करण्याच्या कार्यक्रमानंतर, 188 पैकी केवळ 23 महिलांनी बाळाला जन्म दिला. त्याच वेळी, केवळ व्यायाम गटातील 191 पैकी 29 महिलांनी बाळाला जन्म दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT