Weigh Loss Tips Sakal
आरोग्य

Belly Fat : दीर्घकाळापासून असलेल्या तणावामुळेही वाढू शकते बेली फॅट, समस्या अशी आणा नियंत्रणात

तणावाचे दुष्परिणाम मानसिक आरोग्यासह शरीरावरही पाहायला मिळतात. यामुळे शरीराचे वजन देखील वाढू शकतात.

Harshada Shirsekar

घरातील आणि ऑफिसमधील जबाबदाऱ्यांमुळे काही जणांचे मानसिक आरोग्य बिघडते. यामुळे काही जण नैराश्य, तणाव, चिंता यासारख्या आजारांना बळी पडतात. याचे दुष्परिणाम शरीरावरही पाहायला मिळतात.

मानसिक तणावामुळे शरीरामध्ये कोर्टिसोल हार्मोनचा स्त्राव अधिक प्रमाणात होतो. यामुळे पोटावर अतिरिक्त चरबी  (Belly fat) जमा होण्याची शक्यता असते. मानसिक तणाव कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत?  जाणून घेऊया सविस्तर… 

मानसिक आरोग्याची काळजी घ्या 

जास्तीत जास्त प्रमाणात शांत राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्या आवडीचे संगीत ऐका. एखादा चांगला छंद जोपासा. नियमित व्यायाम करा, मेडिटेशन करावे. यामुळे मन व मेंदूवरील ताण कमी होण्यास मदत मिळू शकते. वेळात वेळ काढून आपल्या जवळच्या माणसांसोबत संवाद साधावा.

व्यायाम करा 

नियमित योगासने किंवा व्यायाम केल्यास शारीरिक तसेच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. यामुळे तणावाचे हार्मोन कमी होतात आणि एंडोर्फिन हार्मोनचा स्त्राव वाढतो. या हार्मोनमुळे पोटावरील चरबीसह तणाव देखील कमी होण्यास मदत मिळू शकते. नियमित केवळ अर्धा तासासाठीही व्यायाम केल्यास तुमच्या पोटावरील वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळेल. 

पौष्टिक आहार 

पोटावरील चरबी तसेच मानसिक तणाव कमी करण्यासाठी आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा देखील समावेश करावा. आहारामध्ये मोठ्या प्रमाणात फळे, भाज्या आणि कडधान्यांचा समावेश करावा. पौष्टिक आहाराचे सेवन केल्यास मानसिक ताण कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल.  

पुरेशा प्रमाणात झोप घेणे

अपुऱ्या झोपेमुळेही शारीरिक तसेच मानसिक आरोग्य बिघडते. या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी सात ते आठ तास झोपणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याप्रमाणे झोपेचेही वेळापत्रक पाळणे आवश्यक आहे. झोपताना मोबाइल फोनचा वापर करणं टाळावे. फोनच्या अति वापरामुळे तुमच्या झोपेवर दुष्परिणाम होतात, हे लक्षात घ्या.    

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Nagpur Election: प्रभाग रचनेने धक्का, आता आरक्षणावर नजर; किरकोळ बदलांसह महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, इच्छुकांमध्ये नाराजी

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

SCROLL FOR NEXT