Angioplasty Surgery esakal
आरोग्य

Angioplasty Surgery : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर केली जाणारी Angioplasty शस्त्रक्रिया नेमकी काय आहे?

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर, त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली.

Monika Lonkar –Kumbhar

Angioplasty Surgery : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरूवारी मुंबईत हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर, या ४७ वर्षीय अभिनेत्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ च्या रिपोर्टनुसार श्रेयस तळपदे हा गुरूवारी ‘वेलकम टू जंगल’ या सिनेमाचे शूटिंग संपवून घरी आला. त्यानंतर, त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे त्याने त्याच्या पत्नीला सांगितले. त्यानंतर, त्याच्या पत्नीने त्याला रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, रूग्णालयात नेत असतानाच तो बेशुद्ध झाला.

श्रेयसला रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. श्रेयसवर करण्यात आलेली ही अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया नेमकी काय आहे? त्याबदद्ल आज आपण जाणून घेणार आहोत.

अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया नेमकी काय आहे?

जेव्हा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो. त्यावेळी, आप्तकालीन परिस्थितीमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली जाते. जर त्या व्यक्तीला हृदयविकार असल्याची शंका डॉक्टरांना आल्यास ही वैकल्पिक शस्त्रक्रिया म्हणून केली जाऊ शकते. अँजिओप्लास्टीला पर्क्यूटेनियस कोरोनरी इंटरव्हेंशन (PCI) असेही म्हटले जाते.

अँजिओप्लास्टी ही एक अशी शस्त्रक्रिया आहे की, ज्याचा उपयोग कोरोनरी धमनी रोगामुळे अवरोधित कोरोनरी धमन्या उघडण्यासाठी केला जातो. ओपन-हार्ट सर्जरीशिवाय हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह पुनर्संचयित करण्याचे काम ही शस्त्रक्रिया करते.

अँजिओप्लास्टी ही शस्रक्रिया करताना रूग्णाच्या रक्तवाहिन्यांमध्ये एक लांब पातळ ट्यूब (कॅथेटर) घातली जाते आणि अवरोधित धमनी उघडण्याचा प्रयत्न केला जातो. कॅथेटरच्या शेवटी एक लहान फुगा असतो.

हा कॅथेटर बसवल्यानंतर हृदयाच्या धमनीच्या अरूंद भागावर फुगा फुगवला जातो. हे धमनीच्या बाजूंच्या विरूद्ध प्लेक किंवा रक्ताची गुठळी दाबण्याचे काम करते. ज्यामुळे, रक्तप्रवाह सुरळीत होण्यास अधिक जागा तयार होते.

कोणत्या समस्यांमध्ये अँजिओप्लास्टी केली जाते?

अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया ही करोनरी आर्टरी डिसीझ, पेरिफेरल आर्टरी डिसीझ, कॅरोटिड आर्टरी डिसीझ आणि क्रोनिक आर्टरी डिसीझमध्ये अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

या शस्त्रक्रियेचा उपयोग हा रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांमध्ये जमा असलेले फॅट्स आणि कॉलेस्ट्रॉलमुळे बनलेले प्लॅक्स काढून टाकण्यासाठी केला जातो. जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT