World Schizophrenia Day 2024 esakal
आरोग्य

World Schizophrenia Day 2024 : स्किझोफ्रेनिया आजार काय आहे? जाणून घ्या लक्षणे अन् उपचार

World Schizophrenia Day 2024 : मानसिक आजार हे गुंतागुंतीचे आणि विविध प्रकारचे असतात. स्किझोफ्रेनिया हा त्यापैकी एक गंभीर आजार होय.

सकाळ वृत्तसेवा

World Schizophrenia Day 2024 : मानसिक आजार हे गुंतागुंतीचे आणि विविध प्रकारचे असतात. स्किझोफ्रेनिया हा त्यापैकी एक गंभीर आजार होय. व्यक्तीच्या वर्तनात, विचारात, भावनेत आणि कार्यक्षमतेत झालेला बिघाड म्हणजेच स्किझोफ्रेनिया. या आजारात विविध लक्षणांचे समूह असू शकतात त्यापैकी सहज ओळखू येणारी लक्षणे म्हणजे प्रभावाची लक्षणे.

यात व्यक्तीच्या वर्तणुकीत सहज लक्षात येतील असे बदल दिसू लागतात. जसं की, भास, भ्रम, विसंगत वर्तणूक, संशय इ. ही लक्षणे लवकर लक्षात आल्यामुळे त्यावर उपचार लवकर होतो. साधारण निरोगी व्यक्तीत आढळून येणाऱ्या भावभावनांची कमतरता म्हणजे अभावाची लक्षणे. यामध्ये व्यक्तीच्या भावना बोथट होतात. सामाजिक संपर्क, काम करण्याचा उत्साह कमी होणे ही अभावाची लक्षणे होत.

लक्षणांचा तिसरा प्रकार म्हणजे बौद्धीक लक्षणे, नातेवाईकांना ही लक्षणे ओळखणे कठीण जाते. बरेचदा रुग्णाला एकच गोष्ट वारंवार सांगावी लागते, रुग्णाचे कामात/अभ्यासात लक्ष लागत नाही. साध्या साध्या गोष्टी आठवत नाहीत. एखादे काम सुरू केल्यावर रुग्ण ते ताबडतोब विसरतो जसं की, फ्रिजमधून काही वस्तू द्यायला सांगितल्यावर रुग्ण फ्रीज उघडतो आणि काय काढायचे हे विसरून जातो. आजार होण्यापूर्वी रुग्ण तासंतास मित्रांशी गप्पा मारत असतो पण आजारानंतर मित्रांसोबत बसतो पण हो-नाही मध्येच उत्तर देतो.

उदा. संतोषने आजार होण्यापूर्वी घरातील सर्व कामांची जबाबदारी घेतली होती. परंतु, आता साधी भाजी आणायची म्हटली तरी त्याला आई-वडिलांची मदत लागते. रुग्णाला योजनाबद्ध रीतीने काम करणे जमत नाही. नेमकं कुठे जायचं, काय घ्यायचं, भाव कसा करायचा यामध्ये त्याचा गोंधळ उडतो.

वरील लक्षणांसोबतच काही रुग्णांमध्ये परिस्थितीशी जुळवून न घेता येणे, कामांमध्ये सतत धरसोड करणे, रोजच्या कामामध्ये शरीरात मंदपणा येणे अशी बौद्धिक लक्षणे दिसून येतात. यामुळे रुग्णाचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक नुकसान होते.

उपचार आवश्यक

स्किझोफ्रेनिया आजारावरील प्रभावाची लक्षणे ही ईसीटी आणि औषधोपचारांनी कमी होतात. परंतु, अभावाच्या लक्षणांसाठी टोकन इकॉनॉमी, वर्तन उपचार पद्धती तर बौद्धिक लक्षणांसाठी कॉग्निटिव्ह रेमेडिएशन थेरपी ही बौद्धिक प्रशिक्षण उपचार पद्धत वापरली जाते. यामध्ये प्रामुख्याने रुग्णाच्या बौद्धिक क्षमतेची चाचणी केली जाते. त्यानंतर दोन पद्धतीने उपचार केले जातात.

१. कॉम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग २. हँड्स ऑन ट्रेनिंग.

ही उपचार पद्धती घेतलेल्या जवळजवळ ९० टक्के रुग्णांना बौद्धिक लक्षणे कमी होण्यात याचा फायदा झालेला आहे, असा अहवाल देशातील एनएबीएच मानांकन मिळालेल्या मानसिक रुग्णालयाने सादर केलेला आहे. ही उपचार पद्धती यशस्वी होण्याकरिता, कोणत्या रुग्णांना ही वापरता येईल हे पाहणे, काळजीवाहकांना याची संपूर्ण माहिती देणे, रुग्णाने थेरपी पूर्ण करणे आणि घरी व रुग्णालयात दिलेल्या सूचनांचे संपूर्ण पालन करणे आवश्यक असते. प्राथमिक लक्षणे कमी होऊन आयुष्याच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यापर्यंतच्या या प्रवासात बौद्धिक लक्षणांवर उपचार घेतल्यामुळे रुग्ण सर्वसामान्य जीवन जगू शकतात.

— डॉ. विनायक पाटील, (मनोविकारतज्ज्ञ, शांती नर्सिंग होम, कांचनवाडी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

SCROLL FOR NEXT