Toxic Shock Syndrome
Toxic Shock Syndrome esakal
आरोग्य

'Toxic Shock Syndrome' म्हणजे काय? जाणून घ्या याची कारणे अन् लक्षणे

साक्षी राऊत

Toxic Shock Syndrome : मासिक पाळी येण्यापासून ते मेनोपॉजपर्यंत, स्त्रियांनी त्यांच्या योनिमार्गाच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. यासाठी योग्य पोषण आणि योग्य हायजिन दोन्ही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. पण अनेक स्त्रिया पीरियड्सदरम्यान स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत नाहीत, ज्यामुळे शरीरात बॅक्टेरिया वाढतात आणि गंभीर आजार होतात.

स्त्रियांमध्ये एक गंभीर समस्या म्हणजे टॉक्झिक शॉक सिंड्रोम आहे. अनहेल्दी लाइफस्टाइल, पीरेड्सदरम्यान हायजिनकडे लक्ष न देणे, जखमेवर सर्जरीदरम्यान निष्काळजीपणा या सगळ्या कारणांमुळे टॉक्झिक शॉक सिंड्रोमचा धोका वाढू शकतो. एक्सपर्टच्या मते टॉक्झिक शॉक सिंड्रोममुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. तेव्हा या समस्येची लक्षणं आणि त्याची कारणे जाणून घेणे महत्वाचे आहे.

जाणून घ्या टॉक्सिक शॉक सिंड्रोम म्हणजे काय? विषारी शॉक सिंड्रोम म्हणजे काय

टॉक्सिक शॉक सिंड्रोम ही एक गंभीर समस्या आहे ज्यामध्ये व्यक्तीचा रक्तदाब असंतुलित होतो. बाहेरून शरीराच्या आत बॅक्टेरियाचे संक्रमण होते, जे रक्तात विषारी पदार्थ सोडतात.

या विषांणूंमुळे होणारे संक्रमण हळूहळू शरीराच्या सर्व भागांमध्ये पसरू शकते, ज्यामुळे यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसाचा संसर्ग देखील होऊ शकतो. हा त्रास वाढला की त्यामुळे हायपरटेन्शन, सिस्टोलिक ब्लड प्रेशर, शरीर कमकुवत होणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

टॉक्झिक शॉक सिंड्रोमची लक्षणे

अचानक उच्च ताप किंवा डायरिया

चक्कर येणे किंवा हलके डोके दुखणे

अनियमित डिस्चार्ज

अत्यंत थकवा आणि अशक्तपणा वाटणे

सांधेदुखी आणि अनियमित रक्तदाब

टाचांचा रंग बदलणे (health)

टॉक्झिक शॉक सिंड्रोमची कारणे

टॉक्झिक शॉक सिंड्रोमची समस्या क्लोस्ट्रीडियम सोड्रेली,स्टैफिलोकोकस ऑरियस नावाच्या बॅक्टेरियामुळे होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, टॅम्पोन लावूनच ठेवणे किंवा पॅड वेळेवर न बदलणे हे या समस्येचे मुख्य कारण असू शकते.

हे जीवाणू गर्भाशयाद्वारे शरीरात प्रवेश करतात, जे रक्तात विषारी पदार्थ सोडून संसर्ग पसरवतात. याशिवाय कोणतीही शस्त्रक्रिया किंवा जखमेच्या वेळी योग्य उपचार आणि स्वच्छतेची काळजी न घेतल्यानेही त्याचा धोका वाढू शकतो. (lifestyle)

टॉक्सिक शॉक सिंड्रोम होऊ नये म्हणून घ्या ही खबरदारी

टॉक्सिक शॉक सिंड्रोमची लक्षणे दिसू लागताच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. यासोबतच मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. दर 4 ते 5 तासांनी पॅड बदलत राहा आणि योनी स्वच्छ ठेवा. यासोबतच आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयींचे अवश्य पालन करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT