World Coconut Day 2023 sakal
आरोग्य

World Coconut Day 2023 : नारळाच्या तेलामुळे आरोग्यापासून ते त्वचा-केसांपर्यंत मिळणारे अगणित लाभ, जाणून घ्या सविस्तर

नारळाच्या तेलाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास कोणकोणते लाभ मिळतात, हे जाणून घेऊया सविस्तर

Harshada Shirsekar

World Coconut Day 2023 : नारळाच्या तेलाचा योग्य प्रमाणात व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार सेवन केल्यास आरोग्यास भरपूर फायदे मिळतील. या तेलातील औषधी गुणधर्मामुळे शरीराचे वजन कमी होण्यापासून ते मधुमेह यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. 

नारळाचे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. पण गंभीर आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी या तेलाचा औषधोपचार म्हणून  वापर केला जाऊ शकत नाही, ही बाब लक्षात ठेवा. आरोग्य निरोगी राहण्याकरिता आपण या तेलाचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सेवन करू शकता. सविस्तर जाणून घेऊया नारळाच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे...

वजन कमी होण्यास मिळते मदत

वेटलॉस करण्यासाठी आपण या तेलाचा डाएटमध्ये समावेश करू शकता. कारण नारळाच्या तेलामध्ये मीडियम चेन फॅटी अ‍ॅसिड जसे की लॉरिक अ‍ॅसिड , कॅप्रेटॅलिक अ‍ॅसिड आणि कॅपरिक अ‍ॅसिड या घटकांचा समावेश असतो. हे घटक शरीराचे वजन कमी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. 

पचनप्रक्रिया सुधारते

नारळाच्या तेलामुळे शरीराची पचनप्रक्रिया सुधारते. या तेलाचा स्वयंपाकासाठी वापर केल्यास पचनप्रक्रियाचे कार्य सुरळीत सुरू राहते. याव्यतिरिक्त पोटाशी संबंधित समस्या उदाहरणार्थ बद्धकोष्ठता, गॅस, पोटदुखी हे त्रास देखील कमी होण्यास मदत मिळू शकते. 

मधुमेहींसाठी फायदेशीर 

नारळाच्या तेलाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास मधुमेहग्रस्त रूग्णांना आरोग्यदायी लाभ मिळू शकतात. केवळ अति प्रमाणात या तेलाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. तसेच नारळाच्या तेलामध्ये शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी उपयुक्त गुणधर्म असतात.

हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक 

नारळाच्या तेलामुळे हृदयाचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. कारण या तेलामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असते, ज्यामुळे हृदय विकारांचा धोका कित्येक पटीने कमी होण्यास मदत मिळू शकते.

पण हृदयविकार असणाऱ्या रूग्णांनी खबरदारी म्हणून आहारात मर्यादित स्वरुपातच या तेलाचा समावेश करावा. अधिक प्रमाणात नारळाच्या तेलाचे सेवन केल्यास आरोग्यास हानिकारक ठरू शकते.

केसांचा पोत सुधारतो 

नारळाच्या तेलाचा हेअर केअर रूटीनमध्ये समावेश केल्यास केसांना नैसर्गिकरित्या मॉइश्चराइझरचा पुरवठा होईल. या तेलाचा आपण हेअर मास्क म्हणून वापर करू शकता. ज्यामुळे केसांना प्रोटीनचा पुरवठा होईल तसंच टाळूची त्वचा देखील निरोगी राहण्यास मदत मिळेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT