World Mental Health Day 2024:  Sakal
आरोग्य

Mental Health: मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी करा 'हे' उपाय, 21 दिवसात दिसेल सकारात्मक परिणाम

World Mental Health Day 2024: तुम्हाला २१ दिवसांमध्ये मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेऊ शकता. यासाठी काय करावे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

World Mental Health Day 2024: दरवर्षी 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' 10 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. जागतिक मानसिक आरोग्य महासंघाच्या पुढाकाराने जागतिक मानसिक आरोग्य दिन 1992 मध्ये साजरा करण्यास सुरूवात झाली. लोकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तुम्हाला २१ दिवसांमध्ये मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेऊ शकता. यासाठी काय करावे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.

पोषक आहार

दिवसाची सुरूवात आरोग्यदायी आणि पोषक पदार्थांनी करावी. आहारात कडधान्य,भाज्या, पालेभाज्या, फळं यासारख्या पदार्थांचा सामावेश करावा. यात असलेले ओमेगा फॅटी अॅसिड, प्रथिने मानसिक आरोग्य निरोगी ठेवते.

योगा

योगा किंवा व्यायम करणे आरोग्यदायी असते. यामुळे शरीर निरोगी तसेच स्नायू लवचिक राहते. मानसिकआरोग्य निरोगी ठेवायेच असेल तर साधा सोपे योगा करू शकता. यात प्राणायम, सुर्यनसम्कार करू शकता. तसेच तुम्ही ध्यान देखील करू शकता

झोप

मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. रोज ७ ते ८ तासाची झोप घेणे गरजेची असते. रात्री झोपताना मोबाईल पाहू नका. जास्तवेळ जागरण करू नका. तसेच लवकर झोपल्यास सकाळी लवकर उठावे.

मित्रांसोबत फिरायला जावे

सतत काम करून आणि एकच दिनचर्याचे पालन केल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत किंवा आवडत्या व्यक्तीसोबत फिरायला जावे. यामुळे तणाव कमी होईल आणि मानसिक आरोग्य निरोगी राहील.

मोबाइलपासून दूर राहा

मोबाइल सध्या आवश्यक वस्तू बनवला आहे. आपली सर्व कामे मोबाईल होतात. तसेच एक मनोरंजनाचे साधन झाले आहे. सतत मोबाइल वापरल्याने ताण येऊन मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. यामुळे एक दिवस मोबाइलपासून दूर राहावे.

कोणत्या पदार्थांचे सेवन करावे

ओट्स

बीन्स

सोया

पालेभाज्या

टमाटर

केळी

सुकामेवा

21 दिवसांमध्ये दिसेल बदल

जर तुम्हाला निरोगी आयुष्य हवे असेल तर पोषक पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच नियमितपणे योगा करावा. यामुळे मानसिक आरोग्य चांगेल राहते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT