India's cough syrup esakal
आरोग्य

India's Cough Syrup : भारतातल्या कफ सिरप वरुन जगभरात वाद का? असा तयार होतो कफ सिरप

गेल्या 10 महिन्यांत भारतातील तीन कफ सिरपबाबत अलर्ट जारी

सकाळ डिजिटल टीम

India's Cough Syrup : गेल्या 10 महिन्यांत भारतातील तीन कफ सिरपबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता इराकमधून नवं प्रकरण समोर आलं आहे. भारतात बनवलेल कोल्ड सिरप हे वैद्यकीय मानकं पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलं आहे. इराकमध्ये पुरवले जाणारे भारतीय कफ सिरप आरोग्यासाठी चांगले नसल्याचा आरोप होतोय.

सौम्य सर्दी आणि ताप बरा करण्यासाठी या सिरपचा वापर केला जातो, परंतु जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय की त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटने सिरपबाबत इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय की सिरपमुळे डायरिया आणि किडनी इन्फेक्शन सारख्या समस्या उद्भवू शकतात. दरम्यान, कफ सिरप कसा बनवला जातो आणि त्यामुले असा त्रास का होतो, असे प्रश्नही उपस्थित होत आहेय. जागतिक आरोग्य संघटनेला असा इशारा द्यावा लागला यामागे नेमकं कारण काय ते जाणून घेऊ...

कफ सिरप कसा तयार होतो?

सिरप तयार करण्यासाठी, त्यातील घटक प्रथम गोळा केले जातात. त्यात डेक्सट्रोमेथोरफान, ग्वायफेनेसिन, अँटीहिस्टामाइन हे घटक असतात. प्रथम हे तिन्ही मिसळले जातात. यानंतर, सिरप गोड करण्यासाठी कृत्रिम स्वीटनर आणि डायथिलीन ग्लायकॉलचा वापर केला जातो. सिरप खराब होऊ नये म्हणून डायथिलीन ग्लायकॉलचा वापर केला जातो. या दरम्यान, डायथिलीन ग्लायकोलचे प्रमाण निर्धारित मानकांनुसार असावे लागते. हे सर्व मिसळल्यानंतर, हे द्रावण गरम केले जाते आणि नंतर थंड केले जाते. अशा प्रकारे कफ सिरप तयार केला जातो.

त्यानंतर गुणवत्ता तपासणीसाठी सिरपचे नमुने घेतले जातात. या दरम्यान ते आरोग्यासाठी घातक आहे की नाही हे पाहिले जाते. सर्व चाचण्या झाल्यानंतर, सिरप लहान बाटल्यांमध्ये पॅक केले जाते. यानंतर पॅकेजिंग लेबल लावले जाते. ज्यामध्ये किती प्रमाणात डोस घ्यायचे आणि सिरपमध्ये कोणते घटक मिसळले आहेत, ही सर्व माहिती दिली जाते. त्यानंतर फार्मा कंपनी सिरप बाजारात आणते.

तज्ञ डॉक्टर सांगतात की, एखाद्या सिरपच्या सेवनामुळे आरोग्याची समस्या उद्भवू शकते का? हे तपासण्यासाठी त्याची जागतिक आरोग्य संघटनेच्या लॅबमध्ये चाचणी केली जाते. जर सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोलचे प्रमाण जास्त आढळले तर ते आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. त्यामुळे लघवी नीट होत नाही आणि किडनी इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. गंभीर लक्षणांमध्ये मृत्यूचा धोका देखील असतो.

आतापर्यंत सतर्क करण्यात आलेल्या सर्व कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोलचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त आढळून आले आहे. हे ग्लायकॉल कोणत्याही औषधात आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे अपचन, उलट्या-जुलाब, किडनी निकामी होण्याचा धोकाही असतो. बर्‍याच प्रकरणांमध्ये फार्मास्युटिकल कंपन्या WHO च्या मानकांनुसार औषध तयार करत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT