Weekly Horoscope
Weekly Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (१० एप्रिल २०२२ ते १६ एप्रिल २०२२)

श्रीराम भट saptrang@esakal.com

आर्थिक लाभ होईल

मेष : अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात अतिशय फॉर्मात येतील. खेळाडू व कलाकारांचं मोठं भाग्य उजळेल. ता. १२ व १३ हे दिवस विशिष्ट विक्रम प्रस्थापित करतील. भरणी नक्षत्रास वरील दिवस व्यावसायिक आर्थिक लाभ करून देतील. तरुणांना परिचयोत्तर विवाहयोग!

मंत्रालयातून लाभ मिळेल

वृषभ : रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींस सप्ताहातील शुक्रभ्रमण कडक उन्हाळ्यातही थंडगार झुळका देईल. व्यावसायिक शुभारंभ. पती वा पत्नीचा नोकरीत भाग्योदय. कृत्तिका नक्षत्रास ता. १३ व १४ हे दिवस संकटविमोचनाचे. मंत्रालयातून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ मोठ्या सुवार्तांतून मौजमजा! मात्र, उष्णताजन्य विकार सांभाळा.

वरिष्ठांची मर्जी संपादन कराल

मिथुन : भाग्यातील शुक्रभ्रमण आणि गुरूचं राश्‍यंतर मोठं अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. ता. १३ व १४ हे दिवस सुवार्तांची पार्श्‍वभूमी ठेवतील. आर्द्रा व्यक्ती अतिशय फॉर्ममध्ये येतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ चा गुरुवार विलक्षण राहील. मोठी चिंता जाईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

कर्क : गुरूचं राशीच्या भाग्यातील आगमन मोठं शुभसूचकच राहील. ता. १३ व १४ हे दिवस मोठा फास्टट्रॅक ठेवतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींची मोठी कामं मार्गी लागतील. व्यावसायिक वास्तुखरेदी. जुन्या गुंतवणुकींतून लाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र घरात सुवार्तांचं कार्य ठरवेल.

नोकरीच्या अफलातून संधी मिळतील

सिंह : सप्ताहात शुक्रभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर जोरदार मुसंडी मारणार आहात. ता. १३ व १४ हे दिवस तरुणांमध्ये चांगलीच जान आणतील. नोकरीच्या अफलातून संधी येतील. मघा नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांतून चर्चेत राहतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात व्यावसायिक मोठी तेजी अनुभवतील. घरातील तरुणांचे भाग्योदय होतील. उष्णताजन्य विकारांपासून काळजी घ्या.

शुभ ग्रहांचे उत्तम योग

कन्या : सप्ताहातील शुभ ग्रहांचे योग चंद्रबळातून उत्तम बोलतील. ओळखी-मध्यस्थी फलद्रूप होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ. मात्र, जुगार टाळा. प्रवासात प्रकृती जपा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात उष्णताजन्य विकारांतून त्रास. पौर्णिमेजवळ धारदार वस्तू जपा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १४ चा गुरुवार भाग्याचा.

नोकरीमध्ये बदलीतून लाभ

तूळ : सप्ताहाची सुरुवात नोकरी-व्यावसायिक उत्तम घडामोडींची. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरी मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह त्वचाविकारातून त्रासाचा. उष्माघातापासून सावध. बाकी स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ व १४ हे दिवस प्रसिद्धियोगाचे. प्रेम प्रकरणात प्रगती. नोकरीत बदलीतून लाभ.

व्यावसायिक प्राप्तीचं रेकॉर्ड होईल

वृश्‍चिक : पौर्णिमेकडे झेपावणाऱ्या चंद्रबळातून अफलातून लाभ होतील. उत्तम पेहेराव करून मार्केटिंगसाठी तयार राहा. ता. १३ ते १६ हे दिवस चढत्या क्रमाने जल्लोष करतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती व्यावसायिक प्राप्तीचं रेकॉर्ड करतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मोठा वाव मिळून मानांकन मिळेल. शुक्रवार मोठ्या भाग्याचा.

मोठे चौकार-षटकार ठोकाल

धनू : पौर्णिमेच्या सप्ताहात शुभ ग्रहांची मंत्रालयं प्रचंड क्रियाशील होऊन आपणास पाठबळ देतील. कनेक्‍टिव्हिटीसाठी अँटिने सज्ज ठेवा. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती चंद्रबळाचा अतिशय लाभ उठवतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती ता. १३ व १४ या दिवसांत मोठे चौकार-षटकार ठोकतील आणि विजयी होतील. पौर्णिमेजवळ आदरसत्कार.

व्यावसायिक वसुली होईल

मकर : ग्रहांचं फिल्ड व्यावसायिक आर्थिक ओघ पूर्ववत करेल. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र शुक्रभ्रमणाची ताकद वाढवेल. व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनं यशस्वी होतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ व १४ हे दिवस मुलाखतींतून यश देणारे. एखादी व्यावसायिक वसुली होईल. सरकारदरबारी यश मिळेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा विवाहयोगाची.

मोठा धनलाभ होईल

कुंभ : राशीतील शुक्रभ्रमण ग्रहांचं फिल्ड ताब्यात घेईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती परिस्थितीचा लाभ उठवतील. मात्र, ऐन उन्हाळ्यातील राशीचं मंगळभ्रमण जुनाट व्याधींच्या पार्श्‍वभूमीवर दखलपात्र. कुपथ्यं टाळा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास पौर्णिमेजवळ मोठे धनलाभ. कलाकारांचे मोठे भाग्योदय. विवाहस्थळांचा पाठपुरावा करा.

स्वतंत्र व्यावसायिकांना उत्तम

मीन : सप्ताहात राशीत गुरूचं आगमन होत आहे. पौर्णिमेकडे झुकणारा हा सप्ताह गुरूच्या स्वागतासाठी सज्जच राहील. स्वतंत्र व्यावसायिकांना हा सप्ताह उत्तमच. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींस सप्ताहाचा शेवट आत्मविश्‍वास वाढवेल. ता. १५ चा शुक्रवार उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना घरातील तरुणांच्या भाग्योदयाचा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत सुवार्ता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT