घरातल्या चिंता मिटतील
मेष : सप्ताहाची सुरुवात शुभसूचकच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना भाग्योदयाचे संकेत. गुंतवणूक फलद्रूप होईल. ता. १७ व १८ हे दिवस शुभ ग्रहांच्या मोठ्या पाठबळाचे. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यातली यंदाची दीपावली विशिष्ट गृहचिंता घालवेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत स्वास्थ्य लाभेल.
नोकरीत मनासारखं वातावरण
वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनात ता. १६ ते १८ हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरणारे आहेत. तरुणांचा भाग्योदय होईल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींचा न्यायालयीन प्रकरणात विजय होईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना खरेदी-विक्रीतून लाभ. मात्र, प्रवासात सांभाळा.
व्यवसायात मोठा लाभ
मिथुन : दीपावलीचा शुभारंभ अतिशय हृद्य राहील. घरातील तरुणांचे भाग्योदय. मृग नक्षत्राच्या व्यक्तींवर धनवर्षाव. ता. १८ व १९ हे दिवस व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या प्राप्तीचे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना दीपावली गुरुकृपेची. विशिष्ट आदर-सत्कारांतून लाभ. विवाहयोग आहेत. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात पुत्रोत्कर्षाची.
दैवी प्रचितीचा अनुभव
कर्क : यंदाची दीपावली ध्येयपूर्तीची. तरुणांना परदेशात भाग्योदय. ता. १७ व १८ हे दिवस मोठे शुभसंबंधित. व्यावसायिक उत्कर्ष. सप्ताहातील शुक्रभ्रमणाची स्थिती व्यावसायिक तेजी आणेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा मंगळवार भाग्याचा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना एकादशीचा शुक्रवार मोठ्या आनंदाचा.
वास्तुयोगाची शक्यता
सिंह : शुभ ग्रहांच्या माध्यमातून उसळी घेणारं ग्रहमान. व्यावसायिकांचे मोठे आर्थिक व्यवहार पार पडतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहाचा शेवट जीवनातील सुंदर क्षणांचा. कलाकारांचे मोठे भाग्योदय. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात वास्तुयोग. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरुवात आणि शेवट नोकरीतील सुवार्तांचा.
नवी क्षितिजं दिसतील
कन्या : यंदाची दीपावली आर्थिक उत्कर्षाचीच. शुभ ग्रहांचंच नेटवर्क राहील. काहींचा नोकरीतील बदलीतून उत्कर्ष. ता. १७ व १८ ऑक्टोबर हे दिवस जीवनातील नवी क्षितिजं दाखवतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन फुलेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात वैयक्तिक मोठे उत्सव, समारंभ घडतील.
व्यवसायात दमदार वाटचाल
तूळ : शुक्राचं राशीतील आगमन काहींची संचारबंदी उठवेल. वैयक्तिक उत्सव-समारंभ होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरी, व्यावसायिक दमदार वाटचाल सुरू होईल. दीपावली उंची खरेदीची. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना दीपावलीचा शुभारंभ धनचिंता घालवेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामात यश लाभेल.
वरिष्ठांची मर्जी राहील
वृश्चिक : सप्ताहाचा आरंभ ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सुवार्तांतून फ्लॅशन्यूजमध्ये आणेल. प्रेमिकांचं स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठांचा कृपाप्रसाद मिळेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ व २१ हे दिवस शुभ ग्रहांच्या नेटवर्कचे. मनासारखी कामं सातत्याने होतील. पुत्रोत्कर्ष, पर्यटनाचे योग.
स्वयंपूर्ण व्हाल
धनू : रवी-शुक्र युतीयोगाचं पर्यावरण अतिशय भावरम्य राहील. घरात पवित्र वातावरण राहील. ता. २१ व २२ या दिवसांत घरात देवतांचा वास राहील. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती भावोत्कट क्षण अनुभवतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना यंदाची दीपावली आत्मनिर्भर करेल. व्यावसायिक शुभारंभ गाजतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रतिष्ठा मिळेल.
नोकरीचे नवे पर्याय मिळतील
मकर : शुक्रभ्रमण ग्रहांचा पट ताब्यात घेईल. तरुणांना शुभग्रहांचं नेटवर्क प्रचंड अनुकूल राहील. नोकरीचे नवे पर्याय पुढे येतील. ता. १७ ते १९ हे दिवस शुभग्रहांच्या उत्तम स्पंदनांचे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती ‘मॅन ऑफ दि मॅच’ होतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना अधिकारपदाचा लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची चैन होईल!
प्रसिद्धीयोग आणि उत्कर्षाचा काळ
कुंभ : सप्ताहातील रवी-शुक्राची राश्यांतरं जबरदस्त क्लिक होतील. दीपावली तरुणांना उमेद देणारीच. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रसिद्धीयोग. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना दीपावली घरातील प्रियजनांच्या उत्कर्षाची. ता. २० ते २२ हे दिवस मोठे हृद्य राहतील. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना धनत्रयोदशी धनवर्षावाची.
शुभ ग्रहांची मोठी साथ राहील
मीन : शुभ ग्रहांचं नेटवर्क प्रचंड संवेदनशील राहील. प्रेमळ माणसांच्या सतत संपर्कात राहा. अर्थातच पवित्र स्पंदनं खेचून घ्या. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ वैवाहिक जीवनात शुभ राहील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा मंगळवार आणि गुरुद्वादशीचा शनिवार मोठा भाग्यसूचक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.