Weekly Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (२० नोव्हेंबर २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२२)

देव, देवता आणि दैव यांच्या परस्परसंबंधांतून हे विश्‍व प्रसवत असतं. पंचमहाभूतांच्या देवता आहेत आणि या पंचमहाभूतांच्या देवता दैवी प्रकृतीचं दैव असल्यासारख्याच आहेत आणि त्याच हा विश्‍वप्रपंच चालवत असतात.

श्रीराम भट saptrang@esakal.com

वादग्रस्त येणं वसूल होईल

मेष : सप्ताह अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट पुत्रचिंतेतून बाहेर काढेल, एखादं वादग्रस्त येणं येईल. मात्र, सप्ताहाच्या शेवटी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना अग्नीपासून भय, काळजी घ्या. अमावास्या वैद्यकीय खर्चाची. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं प्रभावक्षेत्र प्रवासात बेरंगाचं. भावाबहिणीशी वाद टाळा.

मित्रमंडळींकडून लाभ शक्य

वृषभ : बुध, शुक्र सहयोग रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक सुवार्तांतून फ्लॅश न्यूजमध्ये ठेवेल. वैवाहिक जीवनातील हृद्य प्रसंग सद्‌गदित करतील. मित्रमंडळींकडून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना एखादं स्पर्धात्मक यश लाभेल. मात्र, सप्ताहाचा शेवट मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सार्वजनिक जीवनातून विरोधाचा. नोकरीत बदलीतून अस्वस्थता.

व्यावसायिक प्राप्तीत वाढ

मिथुन : मानसिक पर्यावरण बिघडवणाराच सप्ताह. ता. २३ रोजीच्या अमावास्येजवळ आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना चोरी, नुकसानीचे प्रसंग अस्वस्थ करतील. बाकी रवी, गुरू शुभयोग आणि बुध, शुक्र सहयोग व्यावसायिक प्राप्तीत वाढ करतील. सरकारी कामं होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येजवळ विचित्र जागरण.

विविध क्षेत्रांत मोठ्या संधी

कर्क : सप्ताहातील शुभसंबंधित रास. देवदीपावलीत देवतांचा अनुग्रह राहील. रवी, गुरू शुभयोग आणि बुध, शुक्राचा सहयोग तरुणांना शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून मोठ्या संधी देणारा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रयोग. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या कुसंगतीतून भोवेल.

मुलाखतींमध्ये यश

सिंह : शुभग्रहांची गुलाबी थंडी अनुभवाल. मघा नक्षत्राच्या तरुणांना देवदीपावलीची मोठी पर्वणी राहील. ओळखी, मध्यस्थीतून मोठे लाभ. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ चा गुरुवार घबाड योगाचा. व्यावसायिक लाभ. मात्र, शनिवारी घरात वाद टाळा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयीन प्रकरणं सतावतील.

देव-देवतांची कृपा राहील

कन्या : बुध, शुक्र सहयोगाचा एक ट्रॅक राहील. रवी, गुरू शुभयोग नशीब उलगडून देईल. तरुणांचे लांबलेले विवाह जमून येतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना देवदेवतांची मेहेरनजर साथ देईल. हस्त नक्षत्रास सप्ताहाची सुरुवात घरात जल्लोषाची. चित्रा नक्षत्रास शनिवार विचित्र गाठीभेटीचा, दुष्टसंपर्क टाळावा.

सरकारी अनुदान मिळेल

तूळ : सप्ताहात बुध, शुक्र सहयोगाचं एक स्पंदन राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती ही स्पंदनं निश्‍चितच खेचून घेतील. मार्केटिंग क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम लाभ होतील. विशिष्ट सरकारी अनुदान मिळेल. वादग्रस्त येणं वसूल कराल. अमावास्येजवळ घरातील मौल्यवान वस्तू जपा. तुटणं, फुटणं सांभाळा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या शेवटी दुखापतीपासून जपावं.

मानसन्मान लाभतील

वृश्‍चिक : राशीतील लव्हबर्डस्‌ अर्थातच बुध, शुक्र सहयोग गुरुभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर जीवनातील प्युअर स्वीक्वेन्स लावणारा. प्रेमाचे अँटिने रोखूनच ठेवा. सप्ताह अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मानसन्मानातून बोलेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वेदनायुक्त शारीरिक व्याधीचा, अर्थातच जागरणाचा होऊ शकतो.

व्यवसायात धनवर्षावाचा काळ

धनू : अमावास्येचा सप्ताह वक्री ग्रहांच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता पाळण्याचा. गैरसमज टाळा. राजकीय गुंड सांभाळा. बाकी रवी, गुरूचा शुभयोग मूळ नक्षत्राच्या तरुण-तरुणींना नोकरीत भाग्योदयाचा. थोरामोठ्यांच्या संपर्कातून मोठे लाभ. पूर्वाषाढा व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ व्यावसायिक धनवर्षावाचा. उत्तराषाढा व्यक्तींनी भाजणं, कापणं यांपासून जपावं.

सरकारदरबारी मदत मिळेल

मकर : बुध, शुक्र सहयोगाची स्पंदनं व्यावसायिक गाठीभेटींतून फलदायी होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना मंत्रालयातून लाभ. आई-वडिलांचा उत्कर्ष. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम विवाहस्थळं येतील. ता. २१ व २२ नोव्हेंबर हे दिवस भाग्यबीजं पेरणारे. वैवाहिक जीवन फुलेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट खरेदीत फसण्याचा.

तरुणांना नोकरी मिळेल

कुंभ : बुध, शुक्राचा सहयोग नोकरीतील पर्यावरण छान ठेवेल आणि रवी, गुरूचा शुभयोग होतकरू तरुणांना नोकरी देणारा ठरेल. ता. २१ व २२ हे दिवस शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभशकुनी राहतील. विवाहविषयक गाठीभेटी उत्तम प्रतिसाद देतील. व्यावसायिक प्राप्तीचा ओघ वाढेल. पूर्वा भाद्रपदा व्यक्तींना अमावास्या शारीरिक वेदनेतून अस्वस्थ ठेवणारी.

वैवाहिक जीवनात आनंदोत्सव

मीन : बुध, शुक्राचा सहयोग आणि रवी, गुरू शुभयोगाची पार्श्‍वभूमी उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येजवळसुद्धा ग्रहांचा सूर निरागस ठेवेल. नोकरीतील दुष्टचक्र संपेल. मानांकन वाढेल. घरातील तरुणांची कार्यं ठरतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार विशिष्ट भाग्य खेचून आणणारा आणि ता. २५ चा शुक्रवार वैवाहिक जीवनात आनंदोत्सवाचा. शनिवार दंतव्यथेचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT