Weekly Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (२३ जानेवारी २०२२ ते २९ जानेवारी २०२२)

ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालत माणसाचं जीवन हरघडी विकसित होत असतं. प्रत्येक दिवस हा माणसाच्या दृष्टीने विकसित होत असतो किंवा एका निराळ्या अर्थाने विकारीत होत असतो.

श्रीराम भट saptrang@esakal.com

नव्या ओळखी फलदायी ठरतील

मेष : राशीच्या भाग्यातील शुक्रभ्रमण भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितीजन्य लाभ राहील. राशीतील हर्षल नव्या ओळखींतून फलदायी होईल. व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी होईल. २५ जानेवारी चा दिवस मोठ्या गाठीभेटींचा. वास्तुविषयक व्यवहार. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार सुवार्तांची परंपरा ठेवेल.

व्यवसायात मोठी प्राप्ती

वृषभ : सप्ताहाची सुरुवात छानच राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ हे दिवस विशिष्ट स्पर्धात्मक यश देतील. मुलाखतींतून यश. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना कायदेशीर बाबी सतावतील. सप्ताहाचा शेवट कटकटीचा. आजचा रविवार मृग नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक मोठ्या प्राप्तीचा.

नोकरीत मनासारखे होईल

मिथुन : सप्ताहात शुभ ग्रहांचे पॅकेज राहीलच. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती मोठी हुकूमत गाजवतील. नोकरीत मनासारख्या गोष्टी करून घ्याल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ व २९ हे दिवस अनेक प्रकारांतून बेरंग करणारे. घरात गैरसमज होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचे प्रेमप्रकरण रंगात येईल. मात्र खरेदीत जपा.

संमिश्र स्वरुपाचा कालखंड

कर्क : वक्री बुध संमिश्र स्वरूपातून फलदायी होऊ शकतो. तरुणांनी थट्टामस्करी टाळावी. रस्त्यावर पोलिसांशी हुज्जती टाळा. ता. २६ व २९ हे दिवस बॅड डे राहतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना कुपथ्ये महागात पडतील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी थापा मारू नयेत. अर्थातच वैवाहिक जीवनात ! पुनर्वसू व्यक्तींना खरचटण्याचे प्रसंग सतावतील.

परदेशगमनाचा योग

सिंह : मंगळभ्रमण आणि वक्री शुक्रभ्रमण धमाल उडवणार आहेत. ता. २३ ते २५ हे दिवस चढत्या क्रमाने शुभ राहतील. नोकरीत आगामी काळात होणाऱ्या भाग्योदयाची लक्षणं दिसतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमन. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ व २८ हे दिवस वैयक्तिक सुवार्तांच्या जल्लोषाचे !

भावाबहिणींचे विवाह ठरतील

कन्या : सप्ताहात काहीही न बोलता लाभ उठवणारी रास ! उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट राजकीय लाभ. हस्त नक्षत्रास वास्तुयोग. घरात भावाबहिणींचे विवाहप्रश्‍न सुटतील. ता. २३ व २४ हे दिवस मनपसंत घडामोडींचे. मात्र शनिवारी वाहनं जपा. ता. २६ रोजी घरातील लहान मुलांना जपा.

व्यावसायिकांना उत्तम ट्रॅक लाभेल

तूळ : सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना उत्तम ट्रॅक देणारा. मात्र राजकीय व्यक्तींशी अति लगट नको. अकारण गॉसिपिंग टाळा. बाकी मंगळ-शुक्र सहयोगाचे एक पर्व सुरू होणार आहे. त्याची उत्तम लक्षणं सप्ताह दाखवेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ चा मंगळवार भाग्याचा. गुप्त चिंता जाईल.

शुभ ग्रहांचे पाठबळ राहील

वृश्‍चिक : शुभ ग्रहांचा अंडरकरंट राहीलच. सप्ताहात फालतू संभाषणं टाळा. सोशल मीडिया सांभाळा. बाकी अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी शुभ ग्रहांचा अंडरकरंट खेचून घ्यायला काहीच हरकत नसावी. ता. २७ व २८ हे दिवस शुभशकुनी! ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ चा गणराज्य दिन जनसंपर्कातून खराब.

प्रेमिकांना छान फिल्ड

धनु : राशीच्या मंगळ-शुक्राचे अधिराज्य सुरू होत आहे. प्रेमिकांना एक छान फिल्ड राहील. सेंट फवारून बाहेर पडा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ ते २५ हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरणारे. शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून प्युअर सीक्वेन्स लागतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना एकादशी प्रसिद्धियोगाची. मात्र शनिवारी धडपडू नका.

खोटी आश्‍वासनं देऊ नका

मकर : सप्ताहातील वक्री बुध विचित्र फळे देऊ शकतो. कोणास खोटी आश्‍वासने देऊ नका. नातेवाईकांशी गॉसिपिंग नको ! आजचा रविवार थोरामोठ्यांच्या गाठीभेटींतून साध्य करणारा. ता. २६ चा बुधवार मौल्यवान वस्तू जपण्याचा. गर्दीची ठिकाणं टाळाच. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी वाहतुकीत जपावं. दंड आकारणीतून नुकसानी होऊ शकते.

नोकरीच्या उत्तम संधी येतील

कुंभ : सप्ताहात शुभ ग्रह साथ देतीलच. मात्र असंगाशी संग टाळा. बाकी शततारका नक्षत्राच्या व्यक्ती शुभ ग्रहांची स्पंदने खेचून घेतीलच. ता. २४ व २५ हे दिवस मोठे चमत्कार घडवतील. ओळखी - मध्यस्थींतून मोठे लाभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती बिलंदर नव्हे मोठ्या कलंदर बनतील. नोकरीच्या उत्तम संधी येतील. एखाद्या स्त्रीवर छाप पाडाल. विवाहविषयक गाठीभेटी कराच.

राजकीय व्यक्तींकडून लाभ

मीन : सप्ताहात छान-छान कल्पना सुचतील. जगासमोर याल. व्यावसायिक जाहिराती यशस्वी होतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय व्यक्तींकडून लाभ. ता. २७ व २८ हे दिवस एकूणच शुभ ग्रहांचे पर्यावरण ठेवतील. ता. २६ चा बुधवार रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना वेदनायुक्त. काहींना पित्तप्रकोप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT