weekly horoscope 23th july 2023 to 29th july 2023 pjp78 Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य : (२३ जुलै २०२३ ते २९ जुलै २०२३)

अश्रुरोमांचादि अष्टसात्त्विक भाव आणि सुगंध-शय्या-भोजनादि अष्टभोग हे मानवी जीवनाच्या रसभावाचं पोषण करत असतात. आम्ही तर असं म्हणतो की, अनसूयेची एक मातृभावना या सृष्टीच्या बाळाचा सांभाळ करत असते!

श्रीराम भट

कलाकारांचा भाग्योदय

मेष : सप्ताहात वक्री होणारा शुक्र अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना जोरदार फलदायी होईल. ता. २५ ते २७ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. कलाकारांचे मोठे भाग्योदय, नोकरीत प्रशंसेचा कालखंड, व्यावसायिक करारमदारांतून यशस्वी होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट घरात कलहजन्य.

मुलाखतीमध्ये प्रभाव टाकाल

वृषभ : वक्री शुक्रभ्रमणातून लाभ घेणारी रास. सप्ताहाचा आरंभ दैवी प्रचिती देणारा. तरुणांना छंद, उपक्रमांतून मोठं यश मिळेल. नोकरीसाठीच्या मुलाखतींमध्ये प्रभाव टाकाल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचं प्रेम प्रकरण रंगेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या घरात शुक्रवार आनंदोत्सवाचा. शनिवार मात्र विचित्र जागरणाचा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मातृ-पितृचिंता.

मोठे आर्थिक लाभ होतील

मिथुन : वक्री शुक्रभ्रमणातून शुभग्रहांची स्पंदनं जोरदार राहतील. बुध-शुक्र युतियोग सप्ताहावर पूर्ण अंमल करेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ, तरुणांचे प्रेमविवाह. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ ते २७ हे दिवस शुभग्रहांचा फास्टट्रॅक ठेवतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट चैनीवरील खर्चाचा ठरेल.

दुखापतीपासून सांभाळा

कर्क : वक्री शुक्रभ्रमण घरातील सुवार्तांतून प्रसन्न ठेवेल. व्यावसायिक वादग्रस्त वसुली होईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ व २६ हे दिवस विजयोत्सवाचे, नोकरीतील गुप्तचिंता जाईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पती वा पत्नीचा भाग्योदय प्रसन्न ठेवेल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विचित्र धावपळीचा. दुखापतीपासून सांभाळा.

उत्सव-प्रदर्शनांतून लाभ

सिंह : मघा नक्षत्राच्या व्यक्तींना वक्री शुक्रभ्रमणातून मोठं ग्लॅमर मिळणार आहे. शैक्षणिक यश, उत्तम नोकरी मिळेल. व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून मोठे लाभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ व २७ च्या दुर्गाष्टमीच्या प्रभावक्षेत्रात अभूतपूर्व लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी तिन्हीसांजा सांभाळाव्यात.

नोकरीतील ताण कमी होतील

कन्या : सप्ताहारंभी शनी-मंगळ प्रतियुतीचा प्रभाव राहीलच. बाकी हस्त नक्षत्रास बुध-शुक्राची विशिष्ट स्थिती नोकरीतील ताण कमी करणारी. ता. २५ ते २७ हे दिवस मनाजोगती कामं करवून घेणारे. तरुणांचे प्रश्‍न सुटतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तीचं एखादं नुकसान टळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी खरेदी करताना जपावं.

फसवणुकीपासून जपा

तूळ : वक्री शुक्रभ्रमणातून जोरदार मुसंडी मारणार आहात. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती वलयांकित होतील. ता. २५ ते २७ हे दिवस मोठ्या शुभ घटनांतून गतिमानच राहतील. व्यावसायिक प्राप्तीचं रेकॉर्ड मोडाल. स्वाती नक्षत्रास दुर्गाष्टमीचं प्रभावक्षेत्र चिंतामुक्त करणारं. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट फसवणुकीपासून जपण्याचा.

चांगली नोकरी मिळेल

वृश्‍चिक : सप्ताहातील वक्री शुक्रभ्रमणाचा उत्तम लाभ घ्याल. छान व्यावसायिक मार्केटिंग होईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती मॅन ऑफ दि मॅच होतील. ता. २६ व २७ हे दिवस विजयी वार्तांचेच. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना छान नोकरी मिळेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात घरातील वडीलधाऱ्यांशी जपून वागावं.

परदेशात लाभ होतील

धनू : मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील बुध-शुक्र युतियोगाचं फिल्ड तारुण्याचा बहर आणणारं. विवाहेच्छूंनी ऑनलाइन चॅटिंगसाठी तयार रहा. शिवाय, नोकरीच्याही संधीचा लाभ घ्याच. ता. २६ व २७ च्या दुर्गाष्टमीचं प्रभावक्षेत्र स्पर्धात्मक यश देणारं. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी लाभ. मात्र, शनिवारी कुपथ्यं टाळा.

भाग्यबीजं पेरणारा कालखंड

मकर : सप्ताहारंभी वक्री शनीची पार्श्वभूमी आणि मंगळभ्रमण अंमल करेलच. मात्र, बुध-शुक्र युतियोगाची पार्श्वभूमी स्वतंत्र व्यावसायिकांना विशिष्ट ओळखी-मध्यस्थीतून लाभ देईल. घरातील तरुणांची चिंता जाईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना कला, छंद आदी उपक्रमांतून लाभ. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ व २६ हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरतील. धनिष्ठा नक्षत्रास शनिवार गाठीभेटींतून बेरंगाचा.

विवाह-प्रसिद्धीचा योग

कुंभ : वक्री शुक्रभ्रमण बुधाच्या युतियोगात तरुणांना उत्तम फलदायी होईल. शैक्षणिक दिशा मिळेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतीतून यश. ता. २५ ते २७ हे दिवस मोठी नावीन्यपूर्ण शुभफळं देतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रसिद्धीयोग.

न्यायालयीन प्रकरणं सुटतील

मीन : सप्ताह कोर्ट प्रकरणं सोडवणारा. सप्ताह स्त्रीवर्गास अर्थातच गृहिणींना प्रसन्न ठेवेल. घरात कार्यं ठरतील. सप्ताह नवपरिणितांची गुप्तचिंता घालवणारा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ चा गुरुवार व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनं यशस्वी करेल. सरकारी कामं होतील. रेवती नक्षत्रास सप्ताहात वाहनपीडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT