Weekly Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (३ जुलै २०२२ ते ९ जुलै २०२२)

पौर्णिमेचं जसं महत्त्व आहे, तसंच अष्टमीचंही एक महत्त्व आहे. अष्टमी हा एक योग आहे, किंबहुना ती एक योगशक्ती आहे. शुक्‍ल पक्षातील किंवा कृष्ण पक्षातील चंद्रकला ही सारखीच असते.

श्रीराम भट saptrang@esakal.com

कलाकार, खेळाडूंचा भाग्योदय

मेष : राशीतील मंगळाची एक आचारसंहिता राहील. मूर्खांशी संवाद नकोतच. बाकी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात अतिशय संगतीची. झटपट कामं. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ३ ते ५ हे दिवस झकासच. प्रेमिकांना जबरदस्त इम्युनिटी मिळेल. कलाकारांचे, खेळाडूंचे मोठे भाग्योदय.

नवी गुंतवणूक करा

वृषभ : शुभ ग्रहांची मंत्रालयं आपणावर खूष राहतील, घ्या हात धुऊन. गुंतवणूक करा. नव्या ओळखींचा लाभ उठवा. ता. ४ ते ६ हे दिवस रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना चढत्या क्रमाने मजेदार. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तुविषयक व्यवहार. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी पाकीट जपा.

आर्थिक उत्कर्षाची ग्वाही मिळेल

मिथुन : राशीचे रवी-बुध मोठी मजेदार भूमिका निभावतील, फक्त शिस्तबद्ध राहा. व्यावसायिक गाठीभेटी कराच. ता. ६ ते ८ हे दिवस मोठ्या आर्थिक उत्कर्षाची ग्वाही देतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती चतुराईतून मोठे लाभ उठवतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींच्या सुंदर मुलाखती. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रसिद्धियोग.

संकटसमयी गॉडफादर मिळेल

कर्क : गुरुवारच्या अष्टमीच्या प्रभावक्षेत्रात गुरुबळ उत्तम राहील. घरातील तरुणांचे प्रश्‍न सुटतील. काहींना संकटाच्या काळात गॉडफादर भेटतील. मात्र, सप्ताहात नोकरीतील वाद टाळा. शनिवार जपा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ ते ८ हे दिवस प्रचंड प्रवाही. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग.

तरुणांना घवघवीत यश मिळेल

सिंह : सप्ताहात शुक्रभ्रमणाचं सुगंधित स्पंदन राहीलच. ता. ६ ते ८ हे दिवस मोठ्या सुंदर घडामोडींचे, तरुणांना मोठं घवघवीत यश देणारे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारची अष्टमी मोठ्या भाग्योदयाची. व्यावसायिक शुभारंभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना गुडघ्यांचा त्रास.

मानसन्मान मिळेल

कन्या : गुरुवारच्या अष्टमीचं प्रभावक्षेत्र जबरदस्त राहील. नवीन उपक्रम राबवा. तरुणांनो हीच ती वेळ, प्रेम करा किंवा प्रेमात पडा. सप्ताहात बुध-शुक्राच्या ओव्हर्स मोठ्या मजेदार राहतील. मात्र, वाहनावर जपा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सहचरी मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मानाचा किताब मिळेल.

महिलावर्गासाठी काळजीचा कालखंड

तूळ : सप्ताहात मंगळाच्या लष्करी राजवटीचा अंमल वाढेल. पोरी जरा जपून. महिलावर्गाने सांभाळलंच पाहिजे. भावनांचा उद्रेक टाळावा. नोकरदारांचं एक प्रकारचं दुष्टपर्व संपणार आहे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ६ व ७ हे दिवस गुप्तचिंता घालवतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सोमवार मोठ्या लाभाचा.

पूर्वसंचिताचा लाभ होईल

वृश्‍चिक : गुरुभ्रमणाची मोठी पकड ता. ७ च्या अष्टमीच्या प्रभावात वाढेल, त्यामुळेच शुक्रभ्रमणाची ताकद आणखी वाढेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती पूर्वसंचितातून लाभ घेतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार नोकरी-व्यावसायिक भाग्यलक्षणांचाच. शनिवारी घरातील वृद्धांना जपा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्ष.

नोकरीत सन्मानाचा योग

धनू : सप्ताह अष्टमीच्या प्रभावात गुरुभ्रमणाला उजाळा देणारा. सप्तमस्थ बुधभ्रमण त्याला उत्तम साथ देईल. एवंच, ता. ६ व ७ हे दिवस आपल्या राशीस गतिमान असेच, मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत सन्मानाचे, पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक लाभ देणारे. कोर्ट प्रकरण सुटेल. वास्तुयोग.

नोकरीत लाभ होतील

मकर : मंगळभ्रमणाची लष्करी राजवट सुरू होत आहे, घरात दादागिरी नको! बाकी सप्ताहात व्यावसायिक कर्जवसुली होईल. ता. ६ ते ८ या दिवसांत श्रवण नक्षत्रास नोकरीत विशिष्ट लाभ होतील. वरिष्ठांचा कृपाप्रसाद. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार सरकारी कामांतून लाभदायी. शनिवारी वाहन सांभाळा.

विविध उपक्रमांतून लाभ

कुंभ : बुद्धिजीवी मंडळींना सप्ताह त्यांच्या उपक्रमांतून छानच राहील. उद्याचा सोमवार हीच लक्षणं दाखवेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-शुक्राच्या ओव्हर्स छानच धावा काढून देतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मोठे लाभ देईल. पुत्रोत्कर्ष. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी प्रवासात सांभाळावं.

पर्वणीसारखा कालखंड

मीन : सप्ताहातील मोठी लाभसंपन्नच रास राहील. गुरुवारच्या अष्टमीचा गुरुप्रभाव विलक्षणच राहील. जीवनातील श्रद्धा बळकट होतील. उत्तराभाद्रपदा व्यक्तींना ता. ६ ते ८ हे दिवस पर्वणीसारखे. नोकरीतील उत्साह वाढेल. रेवती नक्षत्रास अंगभूत कलागुणांतून प्रकाशात येईल. प्रेमिकांना उत्तम कनेक्‍टिव्हिटी मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT