मेष : राशीचं शुक्रभ्रमण अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर घरात मोठं आनंदी वातावरण ठेवेल. घरात विशिष्ट कार्य ठरवाल. नूतन वास्तूमध्ये प्रवेश कराल. ता. ८ ते १० भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी छानच राहतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार आणि सप्ताहाच्या शेवटच्या शनिवारी संसर्गजन्य आजाराची बाधा होऊ शकते. प्रवासात काळजी घ्या.
वृषभ : सप्ताह कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर छान दिलासा देईल. आरोग्यविषयक दिलासा मिळेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. ७ व ८ या दिवसांमध्ये अमावस्येच्या प्रभावक्षेत्रामुळं प्रवास आणि वाहतुकीत सांभाळावं. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या जागरणाची. उष्माघातापासून सावध राहा. बाकी अक्षय्य तृतीया नोकरीतील घडामोडीतून प्रसन्न ठेवणारी.
मिथुन : आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह नोकरीमधल्या राजकारणातून त्रास देणारा ठरू शकतो. बाकी शुक्रभ्रमण सप्ताहाच्या आरंभी छान असे व्यावसायिक प्रस्ताव पुढं ठेवेल. अमावस्येजवळ दुखापतींपासून सांभाळा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट सार्वजनिक जीवनातून जपण्याचा. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या प्रसिद्धी योगाची, काहींना घबाडसदृश फळं देईल अर्थातच शुभलक्षणाचीच असतील.
कर्क : सप्ताहात राशींच्या एक्स्चेंजमध्ये भाव खाऊन जाणारी ही रास राहील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना अडचणीच्या काळात गॉडफादर भेटेल. ता. ६ व ७ हे दिवस पुष्प नक्षत्राच्या व्यक्तींना गाठीभेटीतून प्रवाही राहतील. सरकारी कामं होतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ व ८ या दिवशी अमावस्येचं फील्ड संमिश्र स्वरूपाची फळं देईल. विचित्र खर्च व नुकसानीचे प्रसंग येतील. नोकरीमध्ये वरिष्ठांशी गैरसमज टाळा.
सिंह : सप्ताह शुभग्रहांमुळे चांगलाच राहील. नोकरीत प्रसन्न वातावरण राहील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना बढतीची चाहूल लागेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या संमिश्र स्वरूपाची ठरेल, दुखापतींपासून सांभाळा. ता. ९ व १० हे दिवस उमलत्या तरुणाईला छानच. विशिष्ट स्पर्धात्मक पातळीवर यश मिळेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल. आदर-सत्कार होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना तीर्थक्षेत्री जाण्याचा योग.
कन्या : अमावस्येचं प्रभावक्षेत्र आपल्या राशीस लक्ष्य करू शकतं. विचित्र बेरंग होण्याचे प्रसंग अनुभवाल. खरेदीमध्ये फसू नका. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना भाजण्या-कापण्याचे प्रसंगांना तोंड द्यावं लागण्याची शक्यता. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींकडून अक्षय्य तृतीयेचा शुक्रवार विशिष्ट बाबींचा शुभारंभ करवेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार नोकरीत भाग्योदयाचा, मात्र शनिवारी राग आवरा. कामगारांशी जपून वागा.
तूळ : ता. ७ व ८ अमावस्येचं प्रभावक्षेत्र प्रदूषित करणारे ठरतील. प्रिय व्यक्तींच्या चिंता राहतील. काहींना जागरणाचे प्रसंग येतील. शुक्रभ्रमणाची स्पंदनं स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना छान अनुभवता येतील. अक्षय्य तृतीयेचा दिवस भावरम्य राहील. सुवार्तेची पार्श्वभूमी राहील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ विद्युत उपकरणांपासून काळजी घ्यावी.
वृश्चिक : ता. ७ आणि ८ या दिवसांमध्ये अमावस्येच्या प्रभावक्षेत्रामुळं ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सांभाळावेच. कोणताही अट्टाहास नको. घरातील स्त्रीवर्गाचं भावविश्व जपा. अमावस्येजवळ यंत्र, विद्युत आणि वाफ आदी माध्यमांतून जपाच. बाकी अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना अक्षय्य तृतीयेचा शुक्रवार विशिष्ट धनलाभातून प्रसन्न ठेवेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता.
धनु : राशीच्या चतुर्थ स्थानातील मंगळभ्रमणाच्या झळा सप्ताहात सतावतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी आहारविहारातून पथ्यं पाळावीत. सप्ताहातील शुभग्रहांचे विशिष्ट शुभयोग सप्ताहारंभी आणि अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत अतिशय छान वातावरण निर्माण करतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी माध्यमांतून लाभ होईल. मात्र आजचा रविवार आणि आठवड्याचा शेवटचा दिवस अर्थात शनिवारी क्रिया-प्रतिक्रिया सांभाळा.
मकर : नुकतंच झालेलं गुरुचं राश्यांतर वैचारिक स्थिरतेकडं नेणारं. अमावस्येनंतर शुक्रभ्रमणाची स्पंदनं जबरदस्त जाणवतील. ता. ९ व १० हे दिवस जीवनातले मोठे चमत्कार घडवतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचं नोकरीमधलं एक शुभपर्व सुरू होत आहे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अक्षय्य तृतीयेचा शुक्रवार वैयक्तिक मोठ्या उत्सव-समारंभातूनच नेणारा. काहींचा साखरपुडा होईल.
कुंभ : सप्ताहाच्या सुरुवातीला चोरीचे प्रसंग संभवतात. अमावस्येनंतर येणारी अक्षय्य तृतीया विक्रमी यश देणारी. शततारका नक्षत्रास ता. ९ व १० घरात प्रसन्न भावस्पंदनं ठेवतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सन्मानातून गौरव करणारा ठरेल. उद्याचा सोमवार मोठे करार-मदार घडवेल. धनिष्ठा नक्षत्रास आजचा रविवार विचित्र गाठीभेटीचा.
मीन : राशीतील मंगळभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर अमावस्येजवळ जुनाट व्याधींचा त्रास होऊ शकतो. आहारविहारादी पथ्यं पाळावीत. बाकी अमावस्येनंतर शुक्रभ्रमण अक्षय्य तृतीयेचा शुक्रवार धनवर्षाव करणारा. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक वसुली होईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ९ व १० हे दिवस गाठीभेटी, करारमदार व मुलाखती यामधून उत्तम परिणाम साधणारे ठरतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.