Weekly Horoscope Sakal
Weekly Horoscope | साप्ताहिक राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (२६ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२)

जीवनाला सतत कशाची तरी उपमा देणारा माणूस एका अर्थी जीवनाचं गांभीर्य सतत वाढवतच असतो!

श्रीराम भट saptrang@esakal.com

जीवनाला सतत कशाची तरी उपमा देणारा माणूस एका अर्थी जीवनाचं गांभीर्य सतत वाढवतच असतो!

परदेशात भाग्योदय

मेष : हा सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना खरोखरच उत्तम राहील. तरुणांनी अवश्‍य लाभ घ्यावा. ता. २९ व ३० हे दिवस आपल्यातील कलागुणांना निश्‍चितच वाव देणारे. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अतिशय कलंदर होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींचा परदेशात भाग्योदय. मात्र, सप्ताहाच्या शेवटी अग्निभय.

नोकरीत सुंदर पर्व सुरू होईल

वृषभ : सप्ताहाची सुरुवात तरुणांना संधी देणारी. एखादा गॉडफादर भेटेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचं ''खुल जा सिम सिम''! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना योगताऱ्याजवळील मंगळ भ्रमण संमिश्र स्वरूपात बोलेल. गृहिणींनी वागण्या-बोलण्यात संयम ठेवावा. बाकी नोकरीत एक सुंदर पर्व सुरू होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पित्तप्रकोपातून त्रास.

जोरदार मुसंडी माराल

मिथुन : सप्ताहात पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्ती जोरदार मुसंडी मारतील. सप्ताहात बुध-शुक्र सहयोग सर्व बाबतीत ऑनलाइन क्‍लिक होणारा. ता. २९ व ३० हे दिवस एकूणच आपल्या राशीस उत्तम. प्रेम प्रकरणात सतत कनेक्‍टिव्हिटी ठेवा. आर्द्रा व्यक्तींना शेअरबाजारातून मोठे लाभ. व्यावसायिक उद्‌घाटनं!

मंत्रालयातून कामं होतील

कर्क : सप्ताहात पुनर्वसु व्यक्तींचा शेअर चांगलाच वधारेल. परिचयोत्तर विवाहाच्या संधी सोडू नका. नका आड आणू ज्योतिषी! बाकी पुष्य नक्षत्र व्यक्ती मोठ्या कलंदर बनतील. मात्र गर्भवतींनी सांभाळावं. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात कर्जवसुलीतून लाभ. सप्ताहात मंत्रालयातून कामं होतील!

यश मिळेल, कीर्तिशिखर गाठाल

सिंह : सप्ताहात चांगलीच हुकमत गाजवणार आहात! मात्र घरी नको! पूर्वा आणि उत्तरा या नक्षत्रांच्या व्यक्तींना ता. २८ ते ३० हे दिवस स्ट्रॅटेजिकल यश देतील. व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी होईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ चा मंगळवार मोठं कीर्तिशिखर गाठून देईल. मात्र, ता. ३१ ची रात्र स्त्रीमुळे बेरंगाची होऊ शकते!

शुभकाळ, प्रेम प्रकरण फुलेल

कन्या : बुध-शुक्र युतीयोगाच्या पॅकेजचा पूर्णपणे लाभ घेणारी रास! फक्त चेहऱ्यावर हास्य ठेवा! सध्या जग हे मार्केटिंगचंच आहे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. काहींचा परदेशी सन्मान. उत्तरा नक्षत्राचं प्रेम प्रकरण फुलेल. हस्त नक्षत्रास ता. ३१ ची रात्र कुसंगतीतून बेरंगाची. सावध.

कलागुणांनी चर्चेत राहाल

तूळ : सप्ताहातील बुध-शुक्र योगाच्या पॅकेजचा काही चतुर मंडळी लाभ उठवतील. प्रेमिकांनो आपलं जाळं टाकाच. बाकी चित्रा आणि विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती आपल्या कलागुणांनी चांगल्याच चर्चेत राहतील. ता. २८ ते ३० हे दिवस सर्वप्रकारे उत्तम! स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. ३१ डिसेंबरची रात्र सांभाळावी. कुसंगत नको.

व्यावसायिक मार्केटिंगला यश लाभेल

वृश्‍चिक : राशीच्या मंगळाचं स्थिरताऱ्याजवळील भ्रमण निश्‍चितच दखलपात्र! कोणतीही थट्टामस्करी नको! नववर्षाचा जल्लोष सांभाळा! अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी चोरी, नुकसानी सांभाळावी. बाकी बुध-शुक्र सहयोगाचं पॅकेज व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी करणारं. ज्येष्ठा नक्षत्रास व्यावसायिक लॉटरी.

वास्तू विषयातल्या कटकटी संपतील

धनू : सप्ताहातील ग्रहमान नववर्षाचं आगमन जल्लोषात करून देईल! व्यावसायिकांना शुभलक्षणं दिसतील! वास्तूविषयक व्यवहारातून मोठे लाभ. विशिष्ट कायदेशीर कटकटी संपतील. नोकरीतील नव्या जडणघडणीतून उत्तम लाभ उठवाल. पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय साहाय्य! मूळ नक्षत्रास कर्ज मिळेल. सप्ताहात प्रवास सांभाळा!

खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील

मकर : सप्ताहात बुध-शुक्र सहयोगाचा अंडर करंट राहील. तरुणांनी त्याचा निश्‍चितच लाभ घ्यावा. मुलाखतींकडं गांभीर्यानं बघा. उत्तराषाढा व्यक्तींना ता. २७ व २८ हे दिवस शुभलक्षणी. मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार. विवाहस्थळं येतील. श्रवण नक्षत्रास ता. २९ चा बुधवार छान गाठीभेटींचा. घनिष्ठा व्यक्तींनी ता. ३१ ची रात्र सर्वप्रकारे जपावी. चोरीपासून जपा.

व्यक्तिमत्त्वाची छाप पाडाल

कुंभ : राशीच्या गुरूच्या राज्यात बुध-शुक्रांचं संमेलन घडणार आहे. यंदाची नववर्षाची पूर्वसंध्या छानच राहील. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती आपल्या कलंदर व्यक्तिमत्त्वाची छाप पाडतील. शततारका नक्षत्राच्या तरुणांचा परदेशी भाग्योदय! मात्र, ता. ३१ डिसें. २१ ची रात्र दुखापतींपासून जपा. वादविवाद टाळा.

नूतन वास्तूमध्ये प्रवेश होईल

मीन : नववर्षाच्या पूर्वसंध्येचा सप्ताह गाजवणारी रास! रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-शुक्राच्या संमेलनाचं अध्यक्षपद मिळणार आहे! व्यावसायिक मोठे शुभारंभ होतील. ता. २६ ते २८ हे दिवस घरात मोठ्या सुवार्तांचा भर ठेवतील. नूतन वास्तुप्रवेश होतील. पूर्वा भाद्रपदा नक्षत्रास गुंतवणुकीतून लाभ. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३१ ची रात्र चोरी, नुकसानीतून बेरंगाची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT