95 दिवसांसाठी रोज 3GB डेटा esakal
सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) आपल्या ग्राहकांना 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक प्रीपेड प्लॅन ऑफर करते. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये ग्राहकांना 95 दिवसांसाठी दररोज 3 GB डेटा आणि कॉलिंग मिळेल. प्लॅनची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे.
Vi चा 499 रुपयांचा प्लॅन: वोडाफोन आयडियाचा प्लॅन 4GB डेटासह येतो. त्याची वॅलिडिटी 56 दिवस आहे. प्लॅनमध्ये वी मूव्हीज आणि टीव्हीचा लाभ अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएससह उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, बिंज ऑल-नाईट आणि वीकेंड डेटा रोलओव्हर सुविधा देखील आहे.Jio चा 499 रुपयांचा प्लॅन: Jio चा 499 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांसाठी दररोज 3GB डेटा + 6GB एक्स्ट्रा डेटा देते. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS दररोज उपलब्ध आहेत. विशेष गोष्ट म्हणजे हे प्लॅन Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह येते. याशिवाय, जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.BSNL चा 499 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये ग्राहकांना 90 दिवसांची वॅलिडिटी मिळते. मात्र दिवाळी ऑफरअंतर्गत हा प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना 95 दिवसांची वॅलिडिटी 06 नोव्हेंबरपर्यंत देण्यात येत आहे. यामध्ये दररोज 3 जीबी डेटा उपलब्ध आहे. हे अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएससह (SMS) विनामूल्य कॉलर ट्यून आणि झिंग अॅपच्या विनामूल्य सब्सक्रिप्शन देखील मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.