स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'मध्ये कांचन देखमुख या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली आहे. कांचन देशमुखची भूमिका अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी साकारली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, त्यांची सून हीदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे.
अर्चना पाटकरचा मुलगा आदित्य हा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे.आदित्यने अभिनेत्री हेमलता बाणेशी लग्न केलं.हेमलता बाणेला लहानपणापासून नृत्याची विशेष आवड असल्याने तिने शाळेत असतानाच ‘मस्ताना’ हा स्टेज शो केला. त्या शोनंतर हेमलताला रेतीवाला नवरा पाहिजे या अल्बमची ऑफर मिळाली. या अल्बमला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.आम्ही सातपुते, इवलासा खोपा,नवरा माझा भवरा, चल धर पकड, कॅरी ऑन देशपांडे, मोहर, सत्य सावित्री आणि सत्यवान, लावू का लाथ, चिरगुट, साहेब यांसारख्या चित्रपटात तिने काम केलं आहे.याशिवाय मानाचा मुजरा, झुंज मराठमोळी यासारख्या शोमध्येही तिने सहभाग घेतला होता.हेमलताने नुकतंच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.