Vitthal-Rukmini temple Sakal
फोटोग्राफी

पाहा, संक्रांतीनिमित्त विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची मनमोहक सजावट

पाहा, संक्रांतीनिमित्त विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची मन मोहवून टाकणारी सजावट

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

विविध सण आणि राष्ट्रीय उत्सव, एकादशी अशा दिवशी श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात आकर्षक मनमोहक सजावट केली जाते.

पंढरपूर (सोलापूर) : मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) निमित्ताने श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात (Shri Vitthal - Rukmini Temple) तब्बल साठ प्रकारच्या फळभाज्या (Vegetables), विविध प्रकारची फुले तसेच तिळगूळ आणि 1 हजार रंगीबेरंगी पतंगांचा (Kites) वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (Adorable decoration of Vitthal-Rukmini temple with fruits and vegetables and flowers)

सुमारे दीड टन फळभाज्या आणि फुलांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे. फळभाज्या आणि पतंग हे आजच्या सजावटीचे खास वैशिष्ट्य आहे. मंदिरात आज जिकडे पाहावे तिकडे भाज्या आणि रंगीबेरंगी पतंग पाहायला मिळत आहेत.
विविध प्रकारच्या भाज्यांचा सजावटीसाठी वापर करण्यात आल्याने संत सावता माळी (Saint Sawta Mali) यांच्या 'कांदा, मुळा, भाजी; अवघी विठाई माझी' या अभंगाची भाविकांना आठवण येत आहे.
विविध सण आणि राष्ट्रीय उत्सव (National Festivals), एकादशी अशा दिवशी श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात आकर्षक मनमोहक सजावट केली जाते.
अनेक भाविक त्यासाठी आधी मंदिर समितीशी संपर्क साधून आवश्‍यक ती फुले आणि फळे उपलब्ध करून देत असतात.
गवार, भेंडी, फ्लॉवर, मुळा, गाजर, वांगी, कोबी, बीट, दोडका आदी साठ प्रकारच्या फळभाज्यांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे. तिळगुळासह झेंडू, शेवंती अशी फुले आणि रंगीबेरंगी पतंग देखील सजावटीसाठी वापरण्यात आले आहेत.
फळभाज्या आणि पतंग हे आजच्या सजावटीचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे संत सावता माळी यांच्या 'कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी' या अभंगाची भाविकांना आठवण येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Rainfall: अर्धे वरीस बरसताहेत सरी! मराठवाड्यामध्ये कोसळला दीडशे टक्के पाऊस

Solapur Crime:'साेलापुरात विवाहितेने संपवले जीवन'; पत्नीच्या माहेरी न कळविताच अंत्यविधीची तयारी, नेमकं काय घडलं?

Nice Dp! पत्नीला मित्राचा मेसेज आला अन् पतीने गळा आवळून जीवघेणा हल्ला केला; धक्कादायक घटना समोर...

Solapur Accident: देवदर्शन अन् काळाचा घाला ! 'बल्करच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार'; अक्कलकोट रोडवरील घटना..

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनात सहभागी असलेल्या नेत्यांवर गुन्हा दाखल, हिंगणा पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT