व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाप्रमाणे माणसामाणसांत आहाराबाबत विविधता आढळते. गेल्या काही वर्षांत अनेक सेलिब्रिटी मांसाहार सोडून शाकाहार जेवणाकडे वळले. काहींनी आपल्या इच्छेने, धार्मिक संकल्पनांमुळे, कौटुंबिर आचारसंहितेमुळे, पचनाच्या तकारींमुळे, वैद्यकीय कारणांमुळे शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला. मांसाहार सोडून शाकाहारकडे वळणारे हे सेलिब्रिटी कोण आहेत, ते पाहुयात..
१- आलिया भट्ट- "मांसाहारमुळे शरीरातील उष्णता वाढत असल्याने मी शाकाहारकडे वळण्याचा निर्णय घेतला. मला आता माझं नवीन डाएट आवडू लागलं आहे. मी कधीच कट्टर मांसाहारी नव्हते", असं आलियाने 'कॉस्मोपॉलिटन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. २- अनुष्का शर्मा- २०१८ मध्ये अनुष्काने शाकाहारीकडे वळण्याचा निर्णय घेतला. "हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय आहे. पशुप्रेम हे त्यामागचं एक मुख्य कारण आहे", असं ती म्हणाली होती. ३- भूमी पेडणेकर- "सवयी मोडणं खूप कठीण असतं. अनेक वर्षांपासून मला मांसाहार सोडायचा होता. पण ते शक्य होत नव्हतं. लॉकडाउनमध्ये मी अखेर शाकाहारकडे वळण्याचा निर्णय घेतला", असं भूमी म्हणाली होती. ४- जिनिलिया डिसूझा-देशमुख- जिनिलियाने काही वर्षांपूर्वी शाकाहारकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. "शाकाहारी बनणं खूप कठीण असेल असं मला वाटलं होतं. पण हळूहळू ते शक्य होत गेलं", असं ती एका मुलाखतीत म्हणाली.५- जॅकलिन फर्नांडिस- प्राणीप्रेमी जॅकलिनने मांसाहार सोडून शाकाहारी आहारासह निरोगी जीवन जगण्याचा निर्णय घेतला. ती अनेक वर्षांपासून मांस आणि डेअरीमुक्त डाएटवर आहे.६- रिचा चड्ढा- २०१४ पासून रिचाने मांसाहार सोडण्याचा निर्णय घेतला. याबद्दल तिने PETA शी चर्चा केली होती. "मला उपदेश न करता त्याबद्दल बोलायचं होतं. शाकाहारीची संपूर्ण संकल्पना 'जगा आणि जगू द्या'वरून निर्माण झाली आहे. अन्न हे संस्कृतीशी जोडलेले आहे. सरसकट शाकाहारी होता आलं नाही तर आठवड्यातून काही दिवस शाकाहारी बनून सुरुवात करू शकतो," असं ती म्हणाली होती. ७- रितेश देशमुख- अवयवदान करण्याचा निर्णय घेणाऱ्या रितेशने काही दिवसांपूर्वी शाकाहारी होण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. "मांसाहार, ब्लॅक कॉफी आणि कोल्ड ड्रिंक्स यांपासून मी दूर राहणं पसंत केलं. मला माझं शरीर निरोगी ठेवायचं आहे. जेव्हा माझे अवयव दान करण्याची वेळ येईल, तेव्हा किमान लोकांनी म्हणायला हवं की, जाता जाता निरोगी शरीर (अवयव) देऊन गेला", असं तो म्हणाला. ८- शाहिद कपूर- गेल्या दशकभरापासून शाहिद हा शाकाहारावर भर देत आहे. ९- श्रद्धा कपूर- २०१९ मध्ये श्रद्धाने व्हेगन होण्याचा निर्णय घेतला. व्हेगन आहारात दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि इतर सर्व प्राणीजन्य पदार्थ वर्ज्य केले जातात. व्हेगन पद्धतीच्या विचारधारेत गाई आणि म्हशींचे दूध हे प्राण्यांच्या शरीरातून येत असल्याने प्राणीजन्य मानले जाते. १०- सोनम कपूर- सुरुवातीला शाकाहाराचा अवलंब करणाऱ्या सोनमने नंतर व्हेगन होण्याचा निर्णय घेतला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.