अमेरिकेत विठुराया रुख्मिणी मातेचा देखावा
खडकवासला : अमेरिकेतील कनेक्टिकट स्टेट मधील फारर्मिंग्टन शहरात महाराष्ट्रातील आयटी इंजिनिअर्सनी एकत्र येऊन गणेशोत्सवाचा देखाव्या करताना वारकऱ्यांचे लोकदैवत असलेली पंढरीच्या विठुराया रुख्मिणी मातेचा देखावा साकारली आहे.
हा देखाव्याचे सर्व श्रेय योगेश आणि वैशाली जाधव यांनी साकारला आहे. जाधव मूळचे नाशिकचे आहेत. योगेश जाधव यांना लहानपणापासूनच गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित देखावे करण्याची हौस आहे. त्यांची ही हौस त्यांनी साता समुद्रापार अमेरिकेतही जोपासलेली आहे. जाधव नोकरीनिमित्त अमेरिकेमध्ये वास्तव्यास असताना देखील गेली तीन वर्षे त्यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक तसेच तिर्थक्षेत्रावर आधारित देखावे त्यांनी रेखाटले आहेत.मागील दोन वर्षांपूर्वी २०१९ साली त्यांनी रायगडावरील शिवरायांची मेघडंबरी साकारली होती. आणि यावर्षी तर त्यांनी चक्क पंढरपूरच्या श्रीविठ्ठल श्रीरुक्मिणी आणि मंदिराचा गाभारा साकारला आहे. विशेष म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती त्यांनी स्वतः माती व कागदाच्या लगद्यापासून तयार केली आहे. प्रत्येक वेळी देखावा सादर करताना त्यांचा भर हा नेहमी इको फ्रेंडली साहित्य वापरण्यावर असतो. श्रीगणेशाची सर्वांगसुंदर मूर्ती देखील त्यांनी कागदाच्या लगद्यापासून बनवून घेतली आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ही 'श्रीं' चीमूर्ती त्यांनी मुंबईहून मागविली आहे. योगेश जाधव हे इंजिनियर आहेत. त्यांना कलेची खूप आवड आहे. देखावा तयार करण्यासाठी फारर्मिंग्टन येथील यांच्या मित्र परिवाराने त्यांना या कामी अहोरात्र मदत केली.
गणेशोत्सवात दहा दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या निमित्ताने त्यांचे सर्व मराठी- अमराठी मित्र परिवार एकत्र येऊन हा उत्सव मराठमोळ्या पद्धतीने साजरा केला. एकादशीच्या दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी पंढरपूरच्या वारी प्रमाणे सर्व मित्र मंडळींनी वारकरी पेहराव करून भजन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.या उत्सवात त्यांना देखावा सादर करण्यासाठी तसेच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यासाठीनविक्रांत व भक्ती टोणपे, सचिन व नम्रता परोपते, कोंढवे धावडे येथील विशाल व सुचित्रा मोकाशी, अभिजित व अनिता मते, अभिषेक व शिल्पी रस्तोगी, शंतनु व अमरजा गोडबोले, रविकांत व रुपाली जगताप, रविराज व सोनाली अन्विकर, निलेश व प्राजक्ता चव्हाण प्रतीक व संध्या डाहुळे या महाराष्ट्रातील कुटुंबांनी हातभार लावला. जाधव गणेशोत्सवाची आवड तसेच त्याची कला त्यांनी युट्युबच्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहचवली आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.