Anti Valentine Week esakal
Anti Valentine Week : व्हॅलेंटाइन वीक फेब्रुवारी महिन्यात असून जगभरातील प्रेमी आपल्या जोडीदारासोबत प्रेमाचा आठवडा साजरा करण्यासाठी खूप उत्सुक असतात. गेल्या आठवड्यात आपण सर्वांनी पाहिलेच आहे, कारण जोडप्यांनी त्यांच्या खास व्यक्तीबरोबर व्हॅलेंटाईन वीकचे वेगवेगळे दिवस साजरे केले रोझ डे ते किस डे पर्यंत. मात्र, प्रेमाचा आठवडा १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेला येऊन ठेपला असताना अनेकांना प्रश्न पडतो की जे व्हॅलेंटाइन डे एन्जॉय करत नाहीत अर्थातच सिंगल आहेत किंवा नुकतेच ब्रेकअपमधून गेले आहेत त्यांचे काय? काळजी करू नका कारण फेब्रुवारी अजून संपलेला नाही बरं का ! गोंधळलात ? बरं, व्हॅलेंटाईन डेनंतर लगेच लोकं अँटी-व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी सज्ज होतायत. तुम्ही बरोबर वाचलंत. म्हणून, जिकडे तिकडे व्हॅलेंटाईन फेवर पाहून कंटाळला असाल आणि तुम्हाला डिटॉक्स हवा असेल तर, अँटी-व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी तुम्हीही सज्ज व्हा! ज्याचा प्रेम आणि रोमान्सशी अजिबात संबंध नाही. काय मग अँटी-व्हॅलेंटाईन वीकचे दिवस वाटतायत ना मजेदार? esakal
स्लॅप डे : अँन्टी व्हॅलेंटाइन वीकचा पहिला दिवस म्हणजे स्लॅप डे हा दिवस १५ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवसानंतर सुरू होतो. हा दिवस अशा लोकांसाठी आहे ज्यांना त्यांच्या 'एक्स' ला थोबाडीत मारायची आहे. ज्यांनी त्यांची फसवणूक केली किंवा मन दुखावलं पण त्यांना अक्षरश: चापट मारावीच असं नाही त्याऐवजी, त्या लोकांसाठी आपल्या भावनांना थोबाडीत मारून आयुष्यात पुढे जाण्याची ही एक उत्तम संधी आहे. किक डे – १६ फेब्रुवारी स्लॅप डे नंतर 'किक डे' हा अँन्टी व्हॅलेंटाइन वीकचा दुसरा दिवस असतो. १६ फेब्रुवारी रोजी आहे. आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता किक मारून काढून टाका. परफ्यूम डे - १७ फेब्रुवारी १७ तारखेला परफ्यूम डे असतो हा अँन्टी व्हॅलेंटाइन डेचा तिसरा दिवस असून यादिवशी स्वत: वर वेळ घालवून बऱ्याच दिवसांपासून पहात असलेला परफ्यूम खरेदी करून स्वतःलाच सरप्राईज करा. फ्लर्टिंग डे -१८ फेब्रुवारी फ्लर्टिंग डे म्हणजे अँन्टी व्हॅलेंटाइन वीकचा चौथा दिवस यंदा शुक्रवारी म्हणजेच १८ फेब्रुवारीला आहे. जर तुम्हाला एखाद्याला 'आस्क आउट' करायचं असेल किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीवर ती पिकअप लाईन वापरण्याची वाट बघत असाल, तर हाच तुमचा दिवस ! कन्फेशन डे -१९ फेब्रुवारी अँन्टी व्हॅलेंटाइन वीकच्या पाचव्या दिवसाला कन्फेशन डे म्हणतात. यंदा तो शनिवार, १९ फेब्रुवारीला आहे. आपल्यासाठी एखाद्याशी मोकळेपणाने बोलण्याची आणि आपल्याला कसे वाटते हे सांगण्याची ही एक उत्तम संधी आहे.या यादिवशी आपण यापूर्वी कोणालाही न सांगितलेल्या गोष्टी सांगू शकता किंवा आपल्या मागील चुकांची कबुली देखील देऊ शकता.
मिसिंग डे -२० फेब्रुवारी मिसिंग डे यावर्षी रविवार, 20 फेब्रुवारी रोजी आहे अँन्टी व्हॅलेंटाइन वीकचा हा सहावा दिवस .आपण ज्यांना मिस करत आहात त्या व्यक्तीस आवर्जुन कळवा आणि आपल्या खऱ्या भावना व्यक्त कराब्रेकअप डे -२१ फेब्रुवारी अँन्टी व्हॅलेंटाइन वीकचा शेवट ब्रेकअप डे ने होतो, जो यावर्षी सोमवारी आला आहे ,जर तुम्ही तुमच्या मानसिक शांततेला हानी पोहोचवणाऱ्या टॉक्सिक नात्यात अडकलेले असाल, तर ब्रेकअप डे दिवशी त्या व्यक्तीपासून वेगळे होऊन स्वतःचे स्वातंत्र्य निवडा.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.