ashadi ekadashi four generations of eknath shinde pandharpur esakal
फोटोग्राफी

PHOTOS: पणजोबा ते पणतू; शिंदे घराण्यातल्या चार पिढ्या विठोबा चरणी!

धनश्री ओतारी

एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला.

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.
पहाटे ०२:०० च्या सुमारास विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. विशेष म्हणजे, विठ्ठलाच्या शासकीय पूजेला शिंदे घराण्याच्या चार पिढ्याही उपस्थित होत्या. एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश शिंदे विठोबा चरणी पाहायला मिळालं.
मुख्यमंत्र्यांसोबत गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी शासकीय महापूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी टाळ वाजवत हरिनामाचा गजर केला. तर, त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलं होतं.
शिवाय, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं महिलांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
आजचा दिवस आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा, महत्वाचा दिवस आहे. पांडुरंगाची कृपा, आई वडीलांची पुण्याई यांच्या मुळे आज महाराष्ट्रारातील बारा कोटी जनतेच्या वतीने आपल्याला पूजा करण्याची संधी मिळाली. अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे मागील दोन वर्ष निर्बंधात पंढरपुरातील आषाढी वारी पार पडली होती. मात्र यंदा आषाढी वारी निर्बंधमुक्त पार पडत आहे. वारीसाठी राज्याच्या कानाकोपर्यातून १२ लाखांहून आधिक भाविक दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT