Big Boss 16 house, luxury circus theme, look photo Google
प्रतिक्षा संपली...बिग बॉस शो विषयी अनेकांना आकर्षण आहे. एक सिझन संपला नाही तर नवीन सिझनच्या प्रतिक्षेत चाहते असतात. सगळ्यांना पहिली उत्सुकता असते ते बिग बॉसचं घर कसं असणार याविषयी. कारण आतापर्यंतच्या सर्वच सिझनमध्ये प्रत्येक नवीन घराचा थाट हा आधीपेक्षा दुपटीनं लक्झुरियस असलेला पहायला मिळाला आहे. चला तर मग पाहूया बिग बॉस १६ चं घर कसं आहे ते. पहाल तर थक्क व्हाल ही गॅरंटी.
बिग बॉस १६ च्या घराचे फोटो समोर आलेयत. आणि या नवीन बिग बॉसच्या घरातला श्रीमंती थाट लक्ष वेधून घेतोय. घरात रहायला जाणाऱ्या स्पर्धकांविषयी आता तुमच्या मनात थोडा जळफळाट होईल ,पण हे तर होणारच नाही का.
बिग बॉस सिझन १६ च्या घराची थीम आहे सर्कस. आता घरात सर्कस चालणार तर अर्थातच घरातील इंटिरियरही त्या पद्धतीनेच असणार नाही का. बिग बॉसच्या नवीन घरात प्रवेशद्वारापासूनच सर्कसची थीम सुरु झालेली दिसून येत आहे.
यावेळी एक नवी गोष्ट पहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच बिग बॉस हिंदीच्या घरात ४ बेडरुम्स असणार आहेत. ज्यात प्रत्येक रुमला एक नाव दिलं गेलंय. फायर रुम, ब्लॅकअॅन्ड व्हाइट रुम,कार्ड्स रुम आणि विंटेज रुम. प्रत्येक रुमची थीमही वेगळी आहे. कॅप्टन रुम खूपच आलिशान असणार आहे. राउंड बेड,लक्झरी फॅसिलिटीज आणि जॅकूझी...हे सारं कॅप्टन रुमला आलिशान बनवणार आहे.यावेळी घरातलं डायनिंग खुपच सुंदर दिसतंय. काही नवीन गोष्टी या घरात सामिल करण्यात आल्य आहेत. घरातील ९८ कॅमेरे १४ स्पर्धकांवर दिवस-रात्र नजर ठेवून राहणार आहेत.
लायटिंग,कलरफुल डेकोरेशन,विविधारंगी डिझाईन्स खरोखरच सर्कस थीमला पू्र्णपणे न्याय देतायत. घराच्या बाहेर असलेल्या स्विमिंग पूलजवळ एक सिटिंग कॉर्नर बनवला गेला आहे. त्या राउंड शेपमधील रेड काउचला एका चमचमणाऱ्या घोड्याचा स्टॅच्यु जोडलेला आहे. आणि ही डिझाइन पूल एरियाला चारचॉंद लावत आहे.घरातलं फर्नीचर असो की शोपीस की अगदी वॉलपेपर..प्रत्येक गोष्टीत लाल, गुलाबी आणि सोनेरी रंगाचं कॉम्बिनेशन ठेवून हायलाइट केल्याचं दिसून येत आहे.बिग बॉसच्या घरात स्पर्धकांच्या हेल्थ-फिटनेसची देखील काळजी घेतली जाते. त्यामुळे घरात जीम एरियाला महत्त्व देत हक्काची वेगळी जागा दिली आहे.
सर्कस थीमचं सर्वातं मोठं आकर्षण असणार मौत का कुआं. इथे स्पर्धकांचे टास्क पार पडणार असावेत. बिग बॉसच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळच सर्कशीतल्या जोकरचं मोठं डिझाईन लावलं गेलंय. आता सर्कस आहे तर जंगलातील प्राणी देखील हवेत ना. म्हणूनच पूर्ण घरात प्राण्यांचे पोस्टर,वॉलपेपर तर काही ठिकाणी स्टॅच्यू लावले आहेत.घरातल्या भींतीना सर्कस थीम ध्यानात ठेवूनच सजवलं गेलं आहे. कितीतरी फेस मास्कोट ठेवले गेलेयत. म्हणूनच कदाचित मेकर्सनी स्पर्धकांच्या चेहऱ्यावर मास्क लावत त्यांना ओळखण्याचा अनोखा गेम सुरु केला होता.घरातलं स्वयंपाकघरही रंगबिरंगी रंगात फुलून गेलंय. हिच ती जागा जिथे कॅट फाइटला सुरुवात होताना दिसते. पण तसं पाहिलं तर शो च्या विनरसाठी किचननं नेहमीच मोठी भूमिका बजावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.