मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांचा समावेश न करण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचं अस्त्र उगारलं आहे. यातच पंकजा मुंडे यांनी केलेला दिल्ली दौऱ्यामुळे या विषयाकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. दिल्लीवरुन परतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी नाराज समर्थकांची समजूत काढली आहे. मुंबईत कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी समर्थकांची समजूत काढत असतानाच अनेकांना अप्रत्यक्ष इशारेही दिले आहेत. पाहूयात पंकजा मुंडे आपल्या भाषणात काय म्हणाल्या आहेत....
मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांचा समावेश न करण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचं अस्त्र उगारलं आहे. यातच पंकजा मुंडे यांनी केलेला दिल्ली दौऱ्यामुळे या विषयाकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. दिल्लीवरुन परतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी नाराज समर्थकांची समजूत काढली आहे. मुंबईत कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी समर्थकांची समजूत काढत असतानाच अनेकांना अप्रत्यक्ष इशारेही दिले आहेत. पाहूयात पंकजा मुंडे आपल्या भाषणात काय म्हणाल्या आहेत....
“माझा आतापर्यंतचा प्रवास खडतर होता, पुढेही खडतरच दिसतोय; पण अविचाराने निर्णय घ्यायचे नसतात, असं सांगत पंकजा यांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे नाकारत असल्याचंही स्पष्ट केलं.मला सत्तेची लालसा नाही, मला खुर्ची नको : पंकजा मुंडेमाझा नेता मोदी, माझा नेता अमित शाह आणि जे. पी. नड्डा : पंकजा मुंडेमाझ्या राजकारणाचा पाया मला मंत्री करा, बहिणीला मंत्री करा, नवऱ्याला मंत्री करा असा नाही. माझा परिवार महाराष्ट्रात मुंडे साहेबांवर प्रेम करणारा निष्पाप कार्यकर्ता आहे. माझ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी राजकारणात आहे.मुंडे साहेबांनी आयुष्यभर खस्ता खाऊन वंचितांना आवाज देण्यासाठी काम केलं. समाजातील तळागाळातील माणूस राजकारणात यायला पाहिजे, लोकप्रतिनिधी झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी सर्वसामान्यांना मंच उपलब्ध करुन दिला. आपल्या हाडामासाचा माणूस लोकांमध्ये उतरला पाहिजे, लोकांमध्ये राहून काम केलं पाहिजे, त्यामुळे त्यांनी मला राजकारणात आणलं.
माझ्या समाजाच्या नेत्याला मी का अपमानित करु. लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात आहे, असं त्या म्हणाल्या. निवडणुकीत अनेक लोक पराभूत झाले. कराड यांचं वय 65 आहे. ते आपल्या समाजाचे आहेत मी त्यांचा अपमान करणार नाही. मला ज्या दिवशी वाटेल इथे राम नाही, त्या दिवशी बघू असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजप सोडणार असल्याच्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे. पक्षाने मला खूप दिलंय, पक्षाने दिलेलं मी लक्षात ठेवते, जे दिलं नाही ते तुम्ही लक्षात ठेवा: पंकजा मुंडे 'जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार, मी कुणालाही घाबरत नाही, माझ्यावर निर्भिड राजकारणाचे संस्कार'- पंकजा मुंडे मुंडे साहेबांना दिलेली सत्ता सामान्य लोकांना दिलेली सत्ता होती. ही सत्ता नियतीने खेचून घेतली, ही सत्ता मी खेचून आणून मी लोकांच्या पायाशी अर्पण केल्याशीवाय राहणार नाही, असं मी त्यावेळी संघर्ष यात्रेमध्ये म्हणाले होते. मी कधीच मुंडे साहेबांना वारसा असल्याचं म्हटलं नाही. मागे मी केंद्रातील मंत्रिपद नाकारलं होतं. आज मी मंत्रिपदासाठी कशी नाराज असेल? आज कार्यकत्यांना मी राजीनामा देऊ देणार नाही. मी लालची नाही, मला सत्तेची लालसा नाही. मला खूर्ची नको. मी असुरक्षित नाही. कुणाला नष्ट करुन मला मंत्री व्हायची नाही.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.