लग्नाची तारीख जवळ येत असेल तर तुम्हाला आतापासूनच तयारी करायला हवी. कारण हा हा म्हणता दिवस निघून जातात आणि लग्नाचा दिवस उजाडतो. अनेकदा नियोजन चांगले केले नसेल तर लग्नाच्या दिवशी गोंधळ उडतो. त्यामुळे सगळ्यात आधी योग्य नियोजन करणे गरजेचे असते.
लग्नात किती सोहळे असणार आहेत ते आधीच ठरवा. तसेच पाहुण्याची यादी बनवून ठेवा. जर लग्नासाठी वेळ बाकी आहे तर याचा सदुपयोग करा. मार्केटमध्ये थोडे शोधून आपल्या बजेटनुसार लवकरात लवकर शॉपिंगचे काम उरकून घ्या. जर तुम्हाला एखादी वस्तू आवडली नाही तर ती वेळेत बदलता येईल. लग्नाचा दिवस खास असतो मात्र बेहिशोबी खर्च तुमचे भविष्य संकटात टाकू शकतो. सगळ्यात आधी आपले बजेट ठरवा आणि ते वाढवत नेऊ नका. कारण त्यामुळे कर्जाची चिंता तुमच्या लग्नाचा आनंद हिरावून घेऊ शकतो. बजेटनुसार ठिकाण, हनीमून, गिफ्टस आणि इतर वस्तू ठरवा. लग्नाआधी बरेच कामे असतात. पत्रिका वाटणे, हॉल निवडणे अशी लहानमोठी बरीच कामे असतात. त्यामुळे खरेदी तसेच इतर साऱ्या गोष्टी वेळ मिळेल तशा करत चला. लग्नानंतर पती-पत्नीला एकत्र वेळ घालवता यावा यासाठी हनीमून असतो. हनीमूनचे तिकीट अथवा बुकिंग शेवटच्या तारखेपर्यंत ठेवू नका. आधीच ठिकाण ठरवून ठेवा. तसेच इतर बुकिंगही कराब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.