फोटोग्राफी

औषधी गुणधर्म असणारी शेवग्याची भाजी वर्षभर 'खा', विकारांवर उपयोगी

शेवग्याची शेंग जशी वर्षभर खाल्ली जाते, पानांची भाजीही पावसाळा अन्‌ हिवाळ्यात खाल्ली पाहिजे.

अमोल सावंत, कोल्हापूर

शेवग्याची भाजी मृग नक्षत्र सुरू झाले, की खाल्ली जाते. मात्र, मृग नक्षत्र झाले, की ही भाजी वर्षभर खाल्ली जात नाही. शेवग्याची शेंग जशी वर्षभर खाल्ली जाते, तशाच पद्धतीने पानांची भाजीही पावसाळा अन्‌ हिवाळ्यात खाल्ली पाहिजे. पानांत अनेक महत्त्वाचे घटक आहेत, जे आरोग्य सुदृढ करतात. शेवग्याची फुले, पाने, शेंगांचा पाककृतीत वापर होतो. तुरट असूनही चवीला असलेला शेवगा ३०० विकारांवर मात करणारा, कुपोषण थांबविणारा आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीचे १५ दिवस म्हणजे एक महिन्याच्या कालावधीला ‘ऋतू संधीकाळ’ म्हणतात, कारण वातावरण बदल सुरू होतात. या कालावधीत पाण्यातही बदल होतात. पाणी गढूळ होते.
पाण्यात अनेक घातक घटक विरघळतात. पावसाळी पाण्यातून अनेक जलजन्य आजार शरीरात उद्‌भवतात. पचन संस्थेचे आजार होतात. अशा वेळी शेवग्याच्या पानांची भाजी अशा आजारांवर उपयुक्त ठरते. ऋतू संधीकाळाबरोबर पावसाळा अन्‌ हिवाळ्यातही ही पानांची भाजी आवश्‍य खावी.
शेवग्याच्या भाजीचे महत्त्व रक्तदाब नियंत्रित, आतड्यांची जखम बरी करणारी, पित्त नियंत्रित, पानाच्या रसात मध घालून अंजन केल्यास डोळ्यांचे विकार बरे होतात, पानाच्या रसात मिरे वाटून लावल्यास डोकेदुखी थांबते, रसाने मॉलिश केल्यास केसातील कोंडा जातो
शेवग्याचा पाला काहीसा तुरट-कडवट चवीचा असतो. मात्र, भाजी केल्यावर तो चविष्ट लागतो. पानांची सुकी भाजी, पातळ भाजी, वड्या, भजी, टिकिया, सूप, झुणका, थालीपीठ, शेवगा पुलाव, शेवगा फुलांची भाजी, फुलांचे भरीत, शेंगेची रसभाजी, पानांची कढी केली जाते.
निसर्गमित्र संस्थेतर्फे १० वर्षे शेवगा महोत्सवाचे आयोजन केले. पाककृती, लागवड, शेवग्याचे महत्त्व लोकांना सांगितले जाते. अनेक लोक ग्रामीण भागात गावरान शेवगा घेत आहेत. त्यामुळे लोकांनी पावसाळा, हिवाळ्यात पानाच्या भाजीचा अन्नात उपयोग केला पाहिजे.’’
तोंड येणे, गळ्याची सूज, वांती, खरुजवर भाजी खावी, शारीरिक थकवा, हाडांची कमजोरी, कृमीवर उपयुक्त, पचनक्रियेशी संबंधित आजार नष्ट होतात
काविळीवर पानांचा ताजा रस, एक चमचा मध, नारळ पाणी एकत्र करून घ्यावे' जठराचा कर्करोग टाळण्यासाठी भाजीचा उपयोग, फुलांची भाजी संधिवातासाठी उत्तम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT