eid 2022  
फोटोग्राफी

सामूहिक नमाज पठण अन् प्रार्थना करत बकरी ईद उत्साहात साजरी

नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

विनायक जाधव

बेळगाव : मुस्लिमांच्या पवित्र सणापैकी एक असलेल्या ईद-अल-अधा (बकरी ईद) रविवारी (ता. १०) मुस्लिम बांधवांतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण आणि प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव शहर आणि परिसरातील विविध मशिदींमध्ये सकाळी ईदच्या नमाजाचे आयोजन करण्यात आले होते. अंजुमन संस्थेतर्फे शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता सार्वजनिक ईदची नमाज अदा करण्यात आली.
पाऊस असूनही ईदगाह मैदानावर झालेल्या नमाजमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मुफ्ती अब्दुल अजीज खाजे यांनी बकरी ईद सणाचे महत्व विशद केले.
या महिन्यात लाखो भाविक आपल्या इस्लामचे पवित्र स्थान मक्का येथे जाऊन हज यात्रा पूर्ण करतात.
या दिवशी कुर्बानी दिली जाते. बेळगावातही आपण सण शांततेत साजरा केला पाहिजे जेणेकरून इतर समाजातील लोकांना त्रास होणार नाही, असे आवाहन करत गोरगरीब लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी हाक दिली.
ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
विशेष प्रार्थनेवेळी आभाळ वृद्धांसह लोक उपस्थित होते. दिवसभर सर्व सोशल मीडियावर देखील ईदच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या.‌
ईद निमित्त कोणतीही अजितकर घटना घडू नये यासाठी इतका मैदान सर्व प्रार्थना स्थळांना पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला होता. ईद सन शांततेत पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT