kolhapur
kolhapur 
फोटोग्राफी

निसर्गप्रेम! जैवविविधता धोक्यात येत असल्याने तरुणाने विदेशी वनस्पतींचे केले उच्चाटन

निवास मोटे

श्री क्षेत्र जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पोहाळे तर्फ आळते गिरोली दाणेवाडी सादळे मादळे या भागात सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या चाळीस वर्षापूर्वी केवळ डोंगर हिरवे करण्यासाठी एकसुरी पद्धतीने विदेशी झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यामुळे या भागातील स्थानिक जैवविविधता धोक्यात आली आहे. प्राणी पशुपक्षी यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही अडचण ओळखून पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथील सुरेश विश्वास बेनाडे या उच्चशिक्षीत तरुणाने जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे.

कामाची सुरुवात म्हणून त्यांनी आपल्याच पाच एकर क्षेत्रातील रानमोडी गिरीपुष्प ( ग्लिसीडीया ) ही झाडे पूर्ण काढून त्या ठिकाणी आता ते पशू पक्ष्यांना खाण्यासाठी फळबाग लागवड करणार आहेत. ज्योतिबा डोंगराच्या हद्दीत अ‍सणाऱ्या जामदार खडी नावाच्या शेतात पूर्वी पाच एकरात गिरीपुष्प निलगिरी सुबाभूळ रानमोडी यासारख्या मोठ्या प्रमाणात विदेशी झाडे विखुरली होती.
बेनाडे यांनी स्वखर्चाने पाच एकर शेतात क्षेत्रातील ही विदेशी वनस्पती पूर्ण काढून घेतली. त्यासाठी त्यांना पंचवीस हजार रुपये खर्च आला. त्या जागेत आता ते आंबा, चिंच जांभूळ फणस नारळ बांबू या देशी झाडांची लागवड करणार आहेत.
या विदेशी वनस्पतीचे पाचट शेतात कूजत नाही. या भागातील पशुपक्षी या विदेशी झाडांकडे फिरकत नव्हते. जोतिबा भागातील पशूपक्षांना खाण्यासाठी फळे मिळावीत व पर्यावरण टिकवण्यासाठी श्री. बेनाडे यांची ही धडपड सुरू आहे.
विदेशी वनस्पतीमुळे जोतिबा परिसर मोठ्या प्रमाणात झाकरण घालत आहे. विदेशी वनस्पतीचे उच्चाटन करणे गरजेचे आहे. आपल्या भागातील देशी फळझाडांची लागवड केल्यावर जैवविविधता धोक्यात येणार नाही. मी स्वतः पाच एकर क्षेत्रातील रानमोडी गिरीपुष्प या झाडाचे उच्चाटन केले आहे. - सुरेश बेनाडे, निसर्गमित्र पोहाळे तर्फ आळते
कृषी खात्याच्या महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून या ठिकाणी ते लागवड करणार आहेत. आता मी येथे मोठी फळबाग लागवड करणार आहे. जेणेकरून या भागातील पशू पक्ष्यांना त्यांचे पारंपरिक खाद्य मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT