esakal
फोटोग्राफी

मोदी है तो मुमकिन है, गुजरातच्या विजयानंतर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

गुजरात टायटन्सच्या विजयानंतर सोशल मीडियावर मॅच फिक्सींगचे वावटळ

धनश्री ओतारी

गुजरात टायटन्सने राजस्थानविरुद्ध आयपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर सोशल मीडियावर मॅच फिक्सींगचे वावटळ उठले.

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये नव्याने पदार्पण केलेल्या गुजराज टायटन्स संघाने आयपीएल चॅम्पियन ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरले. मात्र, सोशल मीडियावर फिक्सींगची चर्चा जोरदार रंगली आहे. काही मीम्सने धुमाकुळ घातला आहे.
गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून विजय मिळवत आपले पहिले वहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे गुजरातचा हा पहिलाच हंगाम आहे. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी देखील हजेरी लावली होती. त्याच्या या उपस्थितीमुळं सोशल मीडियावर मॅच फिक्सींगचे वावटळ उठले आहे.
आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी १ लाखापेक्षा अधिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. राजस्थानविरुद्ध गुजरात टायटन्स हा फायनल सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर येथे खेळवण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी अमित शाह यांनी कुटूंबासह हजेरी लावली होती.
गुजरातच्या विजयानंतर मोदी है तो मुमकिन है. अशी चर्चा रंगली आहे.
काही नेटकऱ्यांनी ये हमारा इलाका हैं अशी मीम्स शेअर करत मोदींचा फोटो शेअर केला आहे.
सामना फिक्स होता म्हणत काही नेटकऱ्यांनी सर्व मोदींचा द्वेष करणाऱ्यांनी बर्नाल लावा. असे म्हटले आहे.
आयपीएल फायनल फिक्सींग म्हणत अमित शाह यांचा जिंकलेल्या इशारा केलेला फोटो शेअर केला आहे.
तर काही नेटकऱ्यांनी नेक्स्ट इलेक्शन इन गुजरात असे म्हणत मोदी गुजरातच्या जर्सीमध्ये मैदानावर क्रिकेट खेळत असल्याची मीम शेअर केली आहे.
गुजरात विरुद्ध राजस्थान फायनल मॅचला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीदेखील हजेरी लावली होती. तर मैदानातील जय शाह आणि गुजरात संघाचा कॅप्टन हार्दिक पांड्या दोघांच्या चर्चेचा फोटो शेअर कर स्पॉट फिक्सींग असा आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT