Fashion tips for winter e sakal
प्रत्येक वर्षी फॅशन ट्रेंड बदलत असतात. मात्र, अनेकदा जुनेच ट्रेंड परत येतात. मग चला तर पाहुयात २०२१ मध्ये काय आहेत फॅशन ट्रेंड (fashion trends of 2021)
पांढऱ्या रंगाचे गुडघ्यापर्यंतचे बूट्स - वास्तविक पाहता ही ६० व्या दशकातील फॅशन आहे. मात्र, ते म्हणतात ना जुनी फॅशन काही काळाने परत येत असते. अगदी तसेच आहे. तुम्ही २०२१ मध्येही ही फॅशल फॉलो करू शकता. पिवळ्या रंगाची हँडबॅग -
ही फॅशन २०२० मध्ये ट्रेंडिंगवर होती. तसेच २०२१ मध्येही अनेकजण ही फॅशन फॉलो करत आहे. आपल्या स्टायलिश लूकसाठी एक कुठल्याही आकाराचा मस्टर्ड कलरची बॅग घ्या. यामुळे तुम्ही अधिकच हटके दिसाल.
हेड स्कार्फ -ही फॅशनच्या ९० च्या दशकातील आहे. मात्र, २०२१ मध्येही ट्रेंड करतेय. स्कार्फमुळे आपल्या केसांना स्टायलिश लूक येतो. तसेच केसांचे संरक्षण देखील होते.
काळ्याचा रंगाचा मास्क -
कुठल्याही स्टायलिश आऊटफिटसोबत काळ्या रंगाचा मास्क शोभून दिसतो. त्यामुळे तुम्हा हा मास्क वापरू शकता. तसेच २०२१ मध्ये हा मास्क ट्रेंडमध्ये पण आहे.
ओवरसाइज्ड शोल्डरपॅड बॉयफ्रेंड जॅकेट - ही फॅशन ८० च्या दशकातील आहे. मात्र, २०२१मध्येही ट्रेंड करत असून शॉर्ट स्कर्टसोबत लेदरचा शॉर्ट स्कर्ट किंवा बूट्स स्टालिश लूक देतात. ओव्हरसाइज्ड शोल्डरपॅड जॅकेट हे स्टायलिश लूकसोबत कॅज्युअल लूक देखील देते.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.