Indias endangered species sakal
India's Endangered Species: भारत (India) हे जैवविविधेच्या (Biodiversity)बाबतीत समृद्ध असून जगातील सुमारे 10% प्रजातींचे निवासस्थान (Habitat) भारतात आहेत.भारतात ५०० हून अधिक अभयारण्ये आणि १०० पेक्षा जास्त राष्ट्रीय उद्याने आहेत,तरीही दुर्दैवाने लोकसंख्येचा विस्फोट, हवामान बदल आणि पर्यावरणविषयक धोरणांच्या अपयशांमुळे अनेक प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.अनेक प्रजाती खूप लवकर नष्ट होण्याची शक्यता आहे.भारतातील अशा संकटात सापडलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्याची नितांत गरज आहे.(five endangered species of animals in India)
'बंगालचे 'रूफ टर्टल'
बंगालचे 'रूफ टर्टल' (बटाग्वार कासव) ही गोड्या पाण्यातील (Freshwater) कासवांची एक प्रजाती आहे.यांचे अस्तित्व गंभीरपणे धोक्यात आले आहे.ते गोड्या पाण्याच्या नद्यांमध्ये राहतात आणि काहीवेळा नदी सोडून लाकडी ,वाळूच्या काठावर उन्हात राहण्यास प्राधान्य देतात. शिकार, पाण्याचे प्रदूषण, माशांच्या जाळ्यांमध्ये अपघातीपणे अडकणे आणि बुडणे, कोल्ह्यांद्वारे यांच्या अंड्यांची होणारी शिकार आधिवासाची कमतरता अश्या कारणामुळे ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
'हूलॉक गिबन'-लांब आणि सडपातळ हात असलेले हे माकड 'हूलॉक गिबन' (Hoolock Gibbon) हे अत्यंत वेगवान प्राणी असतात, हे ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणेस व दिबांग नद्यांच्या उत्तर व पूर्वेस आढळतात.भारतातील आसाम (Assam) , मणिपूर (Manipur) , मिझोराम (Mizoram) , नागालँड (Nagaland) , मेघालय (Meghalaya) , अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा (Tripura) या ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये ही प्रजाती विस्तारली आहे. हे मूळतः दक्षिण भारतातील पश्चिम भागात आढळून येतात. या प्राण्यांच्या शरीरावर सामान्यत: एक काळी 'फर' असते. आधिवासाची कमतरता आणि शिकारीमुळे त्यांची संख्या कमी होते आहे. ते रेनफॉरेस्टचे रहिवासी असुन उत्तम गिर्यारोहक म्हणुन ओळखले जातात.'भारतीय पैंगोलिन'-'भारतीय पँगोलिन' (खवले मांजर) (Indian Pangolin) मूळचे भारतीय उपखंडात आढळतात. आणि 'स्केली अँटीएटर' (Scaly Anteater) किंवा 'थिक टेल्ड पॅन्गोलिन' (Thik Tailed Pangolin) म्हणून देखील ओळखले जाते.या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या प्राण्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात 'स्केल्स' असतात. ज्याद्वारे ते स्वत: चे संरक्षण करतात . ते निशाचर असुन प्रामुख्याने गवताळ प्रदेश, 'रेनफॉरेस्ट', (Rainforest) आणि वाळवंटी क्षेत्रात आढळतात.'सांगई हरिण'-'सांगई' (Sangai) हे मध्यम आकाराचे हरीण असून त्यात गडद लालसर तपकिरी रंगाचा कोट असतो, त्यांना अद्वितीय आणि विशिष्ट शिंग असतात.त्यांना गवत, पाण्यातील जिवंत वनस्पती आणि औषधी वनस्पती आवडतात.ते प्रामुख्याने 'केइबुल लामजाओ' (Keibul Lamjao) राष्ट्रीय उद्यानात आणि गवताळ प्रदेशात आढळतात. विशिष्ट रोगांमुळे आणि शिकारींमुळे यांचं वास्तव्य धोक्यात आले आहे.'हिमालयीन मोनाल'-'हिमालयीन मोनाल ' (Himalayan Monal) हे पक्षी मुळात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानपासून हिमालयामार्गे भारत (india) ,नेपाळ (nepal) ,दक्षिण तिबेट (Tibet) आणि भूतानमध्ये (Bhutan) पसरलेली आहेत.पाकिस्तानातील 'खैबर पख्तुनख्वा',काघन, पळस खोरे आणि आझाद काश्मीरमध्ये तर भारतात जम्मू-काश्मीरपासून ते अरुणाचलपर्यंत संपूर्ण हिमालयीन प्रदेशात यांची नोंद झाली आहे. हे गवताळ भागात , खडक आणि 'अल्पाइन' कुरणांच्या दरम्यान आढळून येतात. शिकारीमुळे आणि राहण्याच्या जागा गमावल्यामुळे यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.