nagpur esakal
फोटोग्राफी

PHOTO: गोवा विधानसभेचा गड जिंकून आलेल्या फडणवीसांचं नागपुरमध्ये जंगी स्वागत

'२०२४ ला स्वबळावर सत्ता काबीज करत भाजप बहुमताचं सरकार स्थापन करणार'

सकाळ डिजिटल टीम

गोव्यातील विजयानंतर फडणीस आज नागपुरात आले आहेत. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली असून ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. यावेळी २०२४ ला स्वबळावर सत्ता काबीज करत भाजप बहुमताचं सरकार स्थापन करेल असं सुचक वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे.

नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.
गोव्यातील विजयानंतर फडणीस आज नागपुरात आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत झाले.
जनतेच्या आशीर्वादामुळे हे यश मिळालं. हा जनतेचा कौल आहे. राष्ट्रीय स्तरावर काम केलं की जबाबदारी बदलते. त्यावेळी सिद्धतेचं आव्हान असतं.
यावेळी त्यांच्या स्वागतासाठी नागपुरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बोलताना त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे कौतुकही केले.
नागपुरकांना केलेला हा सत्कार मी पंतप्रधान मोदी आणि गोव्याच्या जनतेकडून स्वीकारतो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सरकार पडतील अशा संदर्भातील चर्चा मला करायची नाही कारण त्यावर पुन्हा वाद निर्माण होतात, असं एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले आहेत.
ज्या दिवशी राज्यात निवडणुका लागतील मग त्या कोणत्याही असतील महापालिका, जिल्हापरिषद सगळीकडे भाजपाचा झेंडा लागणार आहे, असेही सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चालत्या विमानात प्रवाशाने उघडलं इमर्जन्सी गेट, अलार्म वाजताच पायलटने... धक्कादायक घटनेनं खळबळ

SRH vs KKR: सुनील नरेनचे इतिहास घडवला, 'असा' पराक्रम करणारा पहिलाच ठरला! हैदराबादचा संघ कोलकातासमोर १७० च्या आत ऑलआऊट

"तिने मला ओळखच दाखवली नाही" अश्विनी भावेंवर महेश टिळेकरांनी व्यक्त केली नाराजी "मी सुद्धा रुबाब दाखवू शकतो"

IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या...

Mumbai News: पुनर्विकासात मोठा गेमचेंजर! वरच्या मजल्यावरील रहिवाशांना घर मिळणार, पण अट तळमजल्याच्या पात्रतेची

SCROLL FOR NEXT