प्रेमाचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक नातं होय. हे नातं जपताना अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. जोडीदार जितका समंजस तितकं नातंदेखील समृद्ध बनतं. या नात्यात माता, पिता, भाऊ, बहिण या सर्व भुमिका एकाचवेळी निभवाव्या लागतात आणि त्यासाठी तुमच्या जोडीदाराला तुमचा मित्र असणे गरजेचं असते.
तुमचा जोडीदार जर तुमचा चांगला मित्र असेल तर यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. त्यामुळे केवळ प्रेमाचं नातंच सुलभ होतं नाही असं नाही, तर प्रेम, समाधान आणि सहजतेची भावना अधिक दृढ होते. तुमचा जोडीदार तुमचा चांगला मित्र आहे की नाही कसे ओळखाल? १. कधीही, कोणत्याही गोष्टीवर चर्चा करू शकता... प्रत्येकाचा आपापल्या जोडीदाराशी सुसंवाद असणे खुप महत्त्वाचं आहे. गोष्ट कोणताही असो, विषय कितीही गंभीर असो, तुम्ही याबद्दल तुमच्या जोडीदाराशी कोणतीही भीती न बाळगता मोकळेपणाने चर्चा करू शकत असाल, तर हा या गोष्टीचा पुरावा आहे की, तुमच्यात आणि जोडीदाराच्यात सामंजस्य आहे. त्याच्याशी एखादी गोष्ट शेअर करण्यापूर्वी तुमच्या मनात कधीही दुसरा विचार येणार नाही. तो तुम्हाला समजून घेईल आणि अडचणीतून मार्ग काढायला मदत करेल. त्याच्याकडून तुम्ही अगदी मित्राप्रमाणेच सल्ला घेऊ शकता.
२. तो तुमचा थेरपिस्ट आहे - एक चांगला जोडीदार हा बर्याचदा थेरपिस्टसारखाच असतो. तो तुमची खूप काळजी करतो आणि तुमच्यासोबत असताना परिस्थितीनुसार भूमिका बदलण्यास घाबरत नाही. तो तुमचे ऐकतो, तुम्हाला प्रेरित करतो, तुम्हाला प्रोत्साहन देतो आणि जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्हाला योग्य सल्ला देतो. ३. जोडीदाराची ईर्ष्या न करणारा -
तुम्ही नात्यात असल्यामुळे तुम्हाला कधी इतर मित्राची मदत घेण्याची गरज भासली नसेल. पण बऱ्याचदा तुमचा जोडीदार कामात असेल आणि त्यामुळे तुम्ही जर कुणा मित्रासोबत गेला तर जोडीदाराला असुरक्षित वाटू नये. तुम्ही तुमच्या जोडीदाराचे चांगले मित्र असाल तर असं होणार नाही. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.