how to become a tyrant team esakal
मुंबई - ओटीटी (ott) प्लॅटफॉर्मवरुन वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यात अनेक गंभीर विषयांची मांडणी करण्यात आली आहे. विशेषत नेटफ्लिक्सवर (net flix) कित्येक महत्वपूर्ण विषयावर माहितीपटांची (documentries) निर्मिती केली आहे. आता आपण अशाच एका माहितीपटाविषयी जाणून घेणार आहोत जो सध्या सगळ्याच्या चर्चेचा विषय आहे. जगात आजवर अनेक हुकूमशहा होऊन गेले. त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयीचा आढावा, त्याचं वेगळेपण, त्यांच्याविषयीची गोपनीय माहिती या माहितीपटातून सांगण्यात आली आहे. निर्माते आणि दिग्दर्शक यांनी त्या माहितीपटासाठी केलेला रिसर्च एक प्रेक्षक म्हणून आपण ज्यावेळी ही मालिका पाहतो तेव्हा दमवणारा आहे.
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली How to Become a Tyrant नावाची मालिका सध्या जाणकारांचे लक्ष वेधून घेताना दिसते आहे. या माहितीपटाची सुरुवात अॅडॉल्फ हिटलर (adolf hitler) पासून होते. एकुण सहा हुकूमशाहांचा आढावा माहितीपटात घेण्यात आला आहे. सद्दाम हुसैन (saddam hussain), युगांडाचा सर्वेसर्वा इदी आमीन शीर बार्बरारिझम Idi Amin’s sheer barbarism , जोसेफ स्टॅलिन Joseph Stalin , मुमाआर गद्दाफी Muammar Gaddafi’s आणि उत्तर कोरियाचा किम जोंग North Korea Kim यांनाही या माहितीपटात स्थान देण्यात आले. जगाचा इतिहास बदलु पाहणाऱ्या व्यक्तिमत्वांचा बारकाईनं वेध या माहितीपटात घेण्यात आला आहे. सत्ता, संघर्ष, संपत्ती यांच्या जोरावर सर्वसामान्यांना हाताशी धरुन त्यांचा छळ करणं आणि जगावर राज्य करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्यांचा अभ्यासू आढावा माहितीपटात दिग्दर्शक घेतो. प्रेक्षकांना सुन्न करतो. त्यांना विचारप्रवृत्त करतो. आपण सध्या ज्या काळात राहतो आहोत त्या काळातही हुकूमशहा आहेत. हे सांगताना निर्मात्यांनी गद्दाफ, किंग जोन यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांच्याविषयी त्यानं सांगितलं आहे. राजकारण, समाजकारण, यांच्यावर सर्वाधिक प्रभाव कुणाचा आणि का या प्रश्नाचे उत्तर कदाचित हा माहितीपट पाहिल्यावर आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. सहा भागात विभागलेल्या या मालिकेतील प्रत्येक भागात एका हुकूमशहाचा वेध घेण्यात आला आहे. त्या हुकूमशहाची विचारधारा, त्यानं घडवलेला विध्वंस, त्याचे जागतिक राजकारणावर झालेले परिणाम याची प्रभावी मांडणी माहितीपटात आपल्याला पाहायला मिळते. How to Become a Tyrant चं निवेदन गेम ऑफ थ्रोन्समधील पीटर डिंकलेजनं केलं आहे. त्याच्या आवाजातून माहितीपट आपल्या मनाचा ताबा घेतो. आणि आपल्याला सुन्न करतो. जुने संदर्भ हा माहितीपटाचा महत्वाचा भाग असतो. या माहितीपटात त्याचा समर्पकपणे वापर करण्यात आला आहे. जुने फोटो, लेख, व्हिडिओ, यांचा चपखल वापर माहितीपटात करण्यात आला आहे. त्यामुळे या माहितीपटाची उंची आणखी वाढली आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.